गोवा लसीकरणात अव्वल; मुख्यमंत्र्यांचा दावा

गोव्याच्या 90% लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देण्यात आलाय
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) कोरोना (Covid-19) प्रतिबंधक लसीचा (Vaccination) पहिला डोस (First dose) घेणाऱ्यांची संख्या 10 लाख 91 हजार 198 झाली आहे. शनिवारी तब्बल 14,075 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 5,548 असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 8,527 एवढी आहे. आतापर्यंत राज्यांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 10,91,198 झाली असून, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 3,27,481 एवढी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 14,18,679 लाख लसीकरण झाले आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 15 ऑगस्ट 2023पर्यंत पुर्ण होणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दावा केला आहे की 90 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस देणारे त्यांचे राज्य देशातील पहिले राज्य बनले आहे. "मला हे सांगताना अभिमान वाटतो की गोवा देशातील 90 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. लवकरच गोव्याच्या किनारपट्टी भागातील लसिकरणासाठी पात्र असलेल्या लोकांना लवकरच लसीचा पहिला डोस दिला जाईल. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुढील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार," अशा प्रकारे सावंत यांनी राज्यातील उपक्रमाबाबत माहिती दिली. ते आज रविवारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

CM Pramod Sawant
अखेर गोव्यातील सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकला

मुख्यमंत्र्यांनी फ्रंटलाइन कामगारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले

या दरम्यान गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कोरोना साथीच्या विरूद्ध लढणाऱ्या फ्रंटलाइन कामगारांची प्रशंसा केली. कोरोनाविरुद्ध आमच्या आघाडीच्या कामगारांनी ज्या साहसाने या लढा दिला तो कौतुकास्पद आहे. या आघाडीच्या कामगारांसाठी सरकारकडून शक्य तेवढे प्रयत्न केले जाईल. राज्य सरकारने साथीच्या काळात सर्व समाज कल्याण योजना सुरू ठेवल्या आहेत. असे सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant
गोवेकरांना 16 हजार घनलीटर पाणी मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com