अखेर गोव्यातील सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकला

गेले दोन दिवस तिरंगा फडकवण्याच्या विषयावरून सेंट जासिंतो बेट जगजाहीर झाले आहे. अखेर चर्चच्या धर्मगुरूंनी वादावर तोडगा काढला
Flag Hosting in São Jacinto Island in Goa
Flag Hosting in São Jacinto Island in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गेले दोन दिवस तिरंगा फडकवण्याच्या विषयावरून सेंट जासिंतो बेट जगजाहीर झाले आहे. अखेर चर्चच्या धर्मगुरूंनी वादावर तोडगा काढल्याने शनिवारी दुपारी भारतीय नौदल व स्थानिकांनी एकत्र येऊन तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हटले. शुक्रवारी या बेटावर तिरंगा फडकावण्यासाठी गेलेल्या नौदलाचे अधिकारी आणि इतरांना तेथील रहिवाशांनी व नेतेमंडळी ने अटकाव केल्याने वाद निर्माण झाला होता. स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरातील 100 बेटावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार गोव्यातील तीन बेटावर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस ध्वजारोहण करण्यात येणार होते. येथील बेटावर शुक्रवारी भारतीय नौदलाच्या गोमंतक तळावरील नौदल अधिकारी व जवान गेल्यावर तेथील काही रहिवाशांनी त्यांना अटकाव केल्याने ते ध्वजारोहण न करता परतले. तेथील स्थानिक दर वर्षी स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवत आहे. मात्र नौदलाने गावकऱ्यांना विश्वासात न घेता बेटावर अवजारे घेऊन काम करण्यास सुरुवात केल्याने येथील गावकरी भांबावून गेले. ही माहिती सर्वत्र पसरताच भराभर त्या ठिकाणी लोक जमा झाले. त्यांनी नौदलाच्या सदर उपक्रमाला विरोध केला होता. या प्रकरणामुळे वाद चिघळण्याची लक्षणे दिसत होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून तेथे कोणत्याही परिस्थितीत ध्वजारोहण होणार असल्याचे स्पष्ट केले होते.(Flag Hosting in São Jacinto Island in Goa)

दरम्यान शनिवारी दुपारी नौदल अधिकारी व जवान आणि तेथील चर्चच्या धर्मगुरूंची भेट घेऊन त्यांच्या समवेत चर्चा करून त्यांना एकंदर परिस्थिती सांगितली. त्यामुळे या वादावर पडदा पडला व तेथील सानिकांसमवेत नौदलाने तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हटले.

Flag Hosting in São Jacinto Island in Goa
Flag Hosting in São Jacinto Island in GoaDainik Gomantak

दरम्यान आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेंट जासिंतो बेटावर गावकऱ्यांनी चर्चचे धर्मगुरू जोंसी पेरेरा यांच्या हस्ते ध्वज फडकावून राष्ट्रगीत म्हटले. काल नौदलाने 'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत ध्वज फडकावला होता.तर आजचा मान गावकऱ्यांनी स्वतः घेऊन आपली वार्षिक परंपरा चालू ठेवली. या वेळी गावकर्‍यांनी नौदल अधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी आज आपली उपस्थिती दाखवली व गावकऱ्यांच्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात भाग घेतला. येथील बेटावर चर्चमध्ये प्रार्थना सभा झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, फादर बाॅलमेक्स पेरेरा, कॅप्टन विरीयेटो फर्नाडिस व इतर उपस्थित होते.

यावेळी नौदलातर्फे सेंट जासिंतो बेटावरील नागरिकांना राष्ट्रध्वज भेटीदाखल देण्यात आला. तो चर्चचे धर्मगुरू जोंसी परेरा, फिलिप डिसोझा यांनी स्वीकृत केला. दरम्यान आज ध्वजारोहण प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.

Flag Hosting in São Jacinto Island in Goa
गोवेकरांना 16 हजार घनलीटर पाणी मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

या सगळ्या प्रकारावर उत्तर देताना फिलिप डिसोझा यांचे स्पष्टीकरण -

सेंट जासिंतो बेटावर राष्ट्रध्वज फडकाविण्यास आमचा कोणताच विरोध नसून एखाद्या गावात कोणी येतो आणि गावकऱ्यांना न सांगता बेकायदेशीर कृत्य करतो. हे गावकरी कसे सहन करून घेणार. गावकऱ्यांना त्यांच्या बेकायदेशीर कृत्याबद्दल विचारपूस करण्याचा हक्क आहे. याचा अर्थ असा नव्हे आम्ही राष्ट्रध्वज फडकावण्यास विरोध करतो. पण त्या अगोदर नौदलाने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती सांगणे गरजेचे होते. तसे न झाल्याने गावकऱ्यांमध्ये गैरसमज झाला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सदर परिस्थितीचा आढावा न घेता ध्वज फडकावण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रद्रोही विरोधात कारवाई करा असे शब्द वापरणे चुकीचे आहे. आम्ही राष्ट्राच्या विरोधात नसून सदर बेटावर कोणी कब्जा करू नये या भयाने नौदलाला जाब विचारला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष फिलिप डिसोझा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. याचा अर्थ असा होत नाही आम्ही राष्ट्रद्रोही आहोत.कॅ.विरीयटो फर्नांडीस यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना राष्ट्रद्रोही आम्ही नसून लोकांच्या पैशावर राजकारण करणारे राष्ट्रद्रोही असल्याचे म्हटले.मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान चुकीचे आहे.या विषयावर राजकारण करु नये असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com