गोव्यात 'आप'च्या सलमान खान यांचा राजीनामा; कार्यकारी अध्यक्षानंतर 'युवा' उपाध्यक्षनेही पक्षाची साथ सोडली

Goa AAP Politics: अरविंद केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यानंतर राज्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.
AAP Goa resignation news
Salman Khan resigns from AAP GoaDainik Gomamtak
Published on
Updated on

पणजी: अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौऱ्यात काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर राज्यातील अनेक पदाधिकारी ‘आप’ची साथ सोडत आहेत. सुरुवातीला बाणावलीतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकारी अध्यक्षकांनी देखील राजीनामा दिला होता. दरम्यान, आता युथ विंगच्या उपाध्यक्षाने देखील आपला रामराम ठोकला आहे.

आम आदमी पक्षाच्या युवा संघटनेचा उपाध्यक्ष सलमान खान याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात भेदभाव केला जात असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. हायकमांड उद्धट असून, गोमंतकीयांच्या मतांचा त्यांचा आदर नाही.

आप गोव्यात भाजपच्या विरोधात नव्हे तर त्यांना मदत करण्याचे काम करत आहे. पक्ष भाजप विरोधातील मतांचे विभाजन करत आहे, असा आरोप खान यांनी केला आहे.

AAP Goa resignation news
लैंगिक अत्याचारानंतर अश्लील व्हीडिओद्वारे ब्लॅकमेल केलं; 22 वर्षीय महिलेची म्हापसा पोलिसांत तक्रार

अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात तीन दिवसांचा दौरा केल्यानंतर आपमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गळती सुरु झाली आहे. केजरीवालांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करताना भाजप आणि काँग्रेस एकच असून, काँग्रेस भाजपला मदत करत आहे.

एवढेच नव्हे तर काँग्रेससोबत युती म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केल्यासारखं आहे, असेही केजरीवाल म्हणाले होते. केजरीवालांच्या या वक्तव्याने नाराज झालेले पदाधिकारी आपची साथ सोडताना दिसत आहेत. 

AAP Goa resignation news
Lightening In Goa: 15 मिनिटांच्या पावसात पणजीत पाणीच पाणी, ताळगावत रहिवासी इमारतीवर कोसळली वीज Watch Video

केजरीवाल गोव्यात असतानाच बाणावलीत पॉल लोबो आणि सॅटरनिनो रॉड्रिग्ज यांनी राजीनामा दिला. राज्यातील विरोधक भाजप विरोधात एकवटले असताना केजरीवाल काँग्रेसवर आरोप का करतायेत? असा सवाल लोबो यांनी उपस्थित केला होता.

पक्षातील नेते उद्धट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यापाठोपाठ दोनच दिवसानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश कळंगुटकर यांनी देखील राजीनामा दिला. दरम्यान, आता सलमान खान यांनी देखील पक्षाची साथ सोडली आहे.

दरम्यान, सुरुवातीला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी आणि आता पक्षाचे राष्ट्रीय संयोजक यांनी काँग्रेससोबत युतीची शक्यता खोडून काढली आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पालेकरांनी देखील काँग्रेस आमदारांवर पक्षांतराचा आरोप करत पुढच्यावेळी असं होणार नाही याची काय खात्री अशी शंका उपस्थित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com