लैंगिक अत्याचारानंतर अश्लील व्हीडिओद्वारे ब्लॅकमेल केलं; 22 वर्षीय महिलेची म्हापसा पोलिसांत तक्रार

Goa Crime News: संशयित आरोपी गोव्यात इतर महिलांना देखील विविध आमिष दाखवून अशा पद्धतीने छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
Sexual assault and blackmail Goa
22 year old woman complaint GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचा अश्लील व्हिडिओ करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप २२ वर्षीय महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेने म्हापसा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओद्वारे संशयिता पैसे उकळण्याचा आरोप महिलेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संशयिताने लैंगिक अत्याचारानंतर व्हिडिओ तयार करुन तो व्हिडिओ महिलेला पाठवून ब्लॅकमेल केले. संशयिताने महिलेकडून पैसे देखील उकळले असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेने म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Sexual assault and blackmail Goa
Lightening In Goa: 15 मिनिटांच्या पावसात पणजीत पाणीच पाणी, ताळगावत रहिवासी इमारतीवर कोसळली वीज Watch Video

संशयित आरोपी गोव्यात इतर महिलांना देखील विविध आमिष दाखवून अशा पद्धतीने छळ करत असल्याचा आरोप केला आहे. महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांच्या अत्याचार करुन पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी तपास गतीमान केला आहे.

पीडित महिलेने यासाठी वकील प्रतिमा कुतिन्हो यांची मदत घेतील. कुतिन्हो यांच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस संशयिताचा शोध घेण्यासाठी डिजीटल माध्यमांचा वापर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com