Lightening In Goa: 15 मिनिटांच्या पावसात पणजीत पाणीच पाणी, ताळगावत रहिवासी इमारतीवर कोसळली वीज Watch Video

Heavy Rain In Goa Lightening: हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने शुक्रवारी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती.
Goa monsoon news
Lightning strike Taleigao GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याच्या राजधानीत शुक्रवारी (11 ऑक्टोबर) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या १५ मिनिटांच्या पावसात पणजीत पाणीच पाणी झाले. मुसळधार पावसासोबत वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट पाहायला मिळाला. ताळगाव येथील रहिवासी इमारतीवर यावेळी वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने शुक्रवारी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. दिवसभर राज्यात हवामान कोरडे होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचे ढग जमा झाले. रात्री अकराच्या सुमारास राजधानी पणजीसह उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झाली. पावसासह वारे आणि वीजांचा कडकडाट देखील दिसून आला.

Goa monsoon news
Santa Cruz: वेतन ठरले 24000, प्रत्यक्षात दिले कमी! सांताक्रुझ पंचायतीत 20.72 लाखांचा भ्रष्टाचार; न्यायालयाचे FIR नोंदवण्याचे आदेश

मुसळधार पाऊस सुरु असताना ताळगाव येथे एका रहिवासी इमारतीवर वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. इमारतीमधील सर्वजण सुखरुप असून, इमातीला देखील काही नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वीज कोसळतानाचे भयावह दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Goa monsoon news
Canacona: आरोग्य केंद्रात अडकली लिफ्ट, डायलेसीसच्या रुग्णांवर आली बेशुद्ध होण्याची वेळ; गोवा फॉरवर्डकडून तीव्र संताप व्यक्त

गेल्या चोवीस तासांत कुठे किती पावसाची नोंद झाली?

गेल्या चोवीस तासांत राज्यात पणजी ६०.४ मिमी, धारबांदोडा २४.४ तर, मुरगाव येथे २३.२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय सांगेत १५.२, केपे १५, पेडणे १४.८, साखळी ८.८ आणि दाबोळीत २.८ मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान, मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून, महाराष्ट्रातील काही भागातून पाऊस परतला आहे. याशिवाय गुजरात, मध्यप्रदेश, उत्तप्रदेश आणि बिहारच्या काही भागातूनही मान्सून परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com