प्रँक राजकारण! गोंयकारांना फसवल्याचा सरदेसाई - परबांचा एकमेकांवर आरोप Watch Videos

Goa Politics: आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो तो एक प्रँक होता, असे कथित दिल्लीत भेटीवर मनोज परब यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिले होते.
Goa Politics | Latest News
Vijai Sardesai And Manoj ParabDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झडत आहेत. मनोज परब आणि विजय सरदेसाई यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरु आहे. युती तुटण्यास विजय सरदेसाई आणि अमित पाटकर जबाबदार असल्याचा आरोप परबांनी केल्यानंतर सरदेसाईंनी परबांच्या दिल्ली भेटीच्या प्रँकवरुन त्यांना छेडले आहे.

मनोज परब यांच्या दिल्ली भेटीत काहीतरी जादू झाली आणि युतीबाबत होणाऱ्या चर्चांमध्ये तफावत निर्माण झाली असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला होता. यानंतर आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो तो एक प्रँक होता, असे कथित दिल्लीत भेटीवर मनोज परब यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिले होते.

या प्रँकवरुन विजय सरदेसाई यांनी मनोज परब यांच्यावर निशाणा साधला आहे. परबांनी गोंयकारांवर प्रँक केला असून, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

Goa Politics | Latest News
Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

सरदेसाई पुढे म्हणाले की, "मनोज परब यांच्यावर बोलण्याची गरज नाही. परब प्रँक आहेत. प्रँक केल्याचे त्यांनीच स्पष्ट केले. गोमंतकीयांवर त्यांनी प्रँक केला, यावर अधिक काय बोलायचे. हा विषय प्रँक म्हणूनच घ्यायला हवा, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. एखाद्या महिलेने तुमच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर ती म्हणाली की प्रँक होता, असं होऊ शकतं का? त्यानंतर तुम्हाला कोणी गांभीर्याने घेईल का?," अशी टीका सरदेसाईंनी केली.

Goa Politics | Latest News
दारु प्यायली, फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले अन् पैसे, सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले; पाजीफोंड येथे 9 लाखांची चोरी

सरदेसाई यांच्या टीकेला मनोज परब यांनी लगेच प्रतित्युत्तर दिले आहे. मी प्रँक केला, प्रँक करणाऱ्यांसोबत युती कसली? असे म्हणणाऱ्य़ा विजय सरदेसाईंनी २०१७ साली गोमंतकीयांसोबत प्रँक केला होता. भाजप विरोधात निवडणूक लढवून त्यांच्यासोबतच युती केल्याचा आरोप मनोज परब यांनी केला.

Goa Politics | Latest News
Goa Drug Bust: गोवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 1 कोटींच्या अंमली पदार्थासह बेलारुसच्या महिलेला अटक; तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

"विजय सरदेसाई यांनी २०१७ साली भाजप विरोधात निवडणूक लढत स्वत: आणि आमदाराला निवडून आणले होते. पण, त्यानंतर गोमंतकीयांबरोबर प्रँक करत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते. तोच व्यक्ती आज प्रँकबाबत भाष्य करतोय."

"यांचा पोपट झाल्याचे त्यांच्या मनाला खूप लागले आहे. फातोर्डातून बनावट अकाऊंटद्वारे त्यांची बाजू सावरली जात आहे. २०१७ च नव्हे २०२५ मध्ये देखील त्यांना प्रँक केला होता. त्यामुळे गोमंतकीयांना सरदेसाईंवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करायला हवा. सरदेसाई खूप मोठे प्रँकस्टर आहेत यापूर्वीही त्यांनी प्रँक केलेत आणि २०२७ मध्येही करणार", असा आरोप मनोज परबांनी प्रतित्युत्तर देताना केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com