दारु प्यायली, फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले अन् पैसे, सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले; पाजीफोंड येथे 9 लाखांची चोरी

Goa burglary news: चोरट्यांनी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. काब्राल यांच्या घरात कोणीही वास्तव्यास नसताना चोरट्यांनी संधी साधली.
Theft News
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पाजिफोंड येथे एका बंद घरात चोरट्यांनी चोरी करून सुवर्णालंकार व रोकड मिळून अंदाजे नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. गेले सहा दिवस हे घर बंद होते. गुरुवारी चोरीची घटना उघडकीस आली.

फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्न यानांही  पाचारण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी सोन्याचे दागिने व सुमारे ५० हजार रुपये रोकड चोरून नेली.

ओरलांड काब्राल यांच्या मालकीचे हे घर आहे. चोरट्यांनी या घराच्या स्वयंपाक घरातील खिडकीचे ग्रील्स तोडून आत शिरून नंतर आतील मौल्यवान ऐवज चोरून नेला.

Theft News
Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, चोरट्यांनी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. काब्राल यांच्या घरात कोणीही वास्तव्यास नसताना चोरट्यांनी संधी साधली. गेल्या सहा दिवसांपासून घर बंद असल्याने चोरट्यांनी त्याला निशाणा केले.

चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तर चोरी केलीच पण, घरातील दारु आणि फ्रिजमधील खाद्यपदार्थांवर देखील ताव मारला. फातोर्डा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Theft News
Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

दरम्यान, घराचे मालक काब्राल हे ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचे वास्तव्य या घरात नाही. गेल्या सहा दिवसांपासून घर बंद असल्यानेच त्याला टार्गेट करण्यात आले असावे असा अंदाज बांधला जात आहे.

यापूर्वी राज्यात दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरफोडीच्या घटनांना चाप बसविण्याची मागणी होत असताना आणखी एका चोरीच्या घटनेने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com