Goa Governor: पंडित नेहरुंना गोव्याचा बळी द्यायचा होता का, स्वातंत्र्याला 14 वर्ष उशीर का झाला? राज्यपाल पिल्लई यांचा सवाल

Goa Governor P. S. Sreedharan Pillai: गोव्याचा मुक्तीसंग्राम भारतीय विद्यार्थ्यांना शिकवायला हवा, असे मत यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी व्यक्त केले.
पंडित नेहरुंना गोव्याचा बळी द्यायचा होता का, स्वातंत्र्याला 14 वर्ष उशीर का झाला? राज्यपाल पिल्लई यांचा सवाल
Pandit Jawaharlal Nehru And Goa Governor P. S. Sreedharan PillaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Governor P. S. Sreedharan Pillai

पणजी: गोवा राज्याचा मुक्तीसंग्राम भारतीय विद्यार्थ्यांना शिकवायला हवा. गोव्याला स्वातंत्र्य मिळायला १४ वर्षे उशीर का झाला? पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना जागतिक शांततेसाठी गोव्याचा बळी द्यायचा होता का? असे मत गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'डिसेंबर डाऊन' या भारतीय स्वातंत्र्यावर आधारित माहितीपटाच्या पोस्टरचे राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक शारदाताई आणि रोहिदास रघुनाथ नाईक उपस्थित होते. डिसेंबर डाऊन माहितीपट गोव्याच्या मुक्तीसाठी भारतीय सैनिकांनी राबवलेल्या 'ऑपरेशन विजय'वर बेतलेला आहे.

पंडित नेहरुंना गोव्याचा बळी द्यायचा होता का, स्वातंत्र्याला 14 वर्ष उशीर का झाला? राज्यपाल पिल्लई यांचा सवाल
Viral Video Goa: मेरे करण अर्जुन आएंगे! प्रश्न विचारताच सलमान - शाहरुखच्या फिल्मी आईने हातच जोडले, म्हणाली Please...

गोव्याचा मुक्तीसंग्राम भारतीय विद्यार्थ्यांना शिकवायला हवा, असे मत यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी व्यक्त केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा स्वतंत्र व्हायला १४ वर्षे उशीर का झाला? असा प्रश्न विचारायला हवा. पंडित नेहरुंना जागतिक शांततेसाठी गोव्याचा बळी द्यायचा होता का? असे राज्यपाल पिल्लई म्हणाले.

पंडित नेहरु त्यावेळी गोव्यात सैन्य कारवाईबाबत जागृक नव्हते. पण, जागतिक शांततेसाठी गोव्याचा बळी द्यायचा?, असा सवाल पिल्लई यांनी उपस्थित केला. १२ शतकात भारत चीनप्रमाणे एक प्रगतशील देश होता. त्याचमुळे शेक्सपिअरच्या दोन नाटकातील पात्र भारतात प्रवास केल्याचे स्वप्न पाहत असल्याचे दाखवण्यात आलंय, असे पिल्लई म्हणाले.

पंडित नेहरुंना गोव्याचा बळी द्यायचा होता का, स्वातंत्र्याला 14 वर्ष उशीर का झाला? राज्यपाल पिल्लई यांचा सवाल
Aditya Jambhale At IFFI: '..मौजमजा म्‍हणजे गोवा नव्‍हे'; Article 370 च्या दिग्दर्शकाची गोमंतकीय चित्रपटसृष्टी, पर्यटनाबद्दलची परखड मते वाचा

गोव्याच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास भारतीय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, असेही राज्यपाल पिल्लई म्हणाले. डिसेंबर डाऊन या गोव्याच्या मुक्तीसंग्रामावर आधारित माहितीपटाचे दिग्दर्शन दीनेश भोसले यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

why indian cricketers join foreign leagues
Pandit Jawaharlal Nehru last wish
Amit Patkar Congress Criticism PM Modi
Fake Indian Passport Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com