Aditya Jambhale At IFFI: '..मौजमजा म्‍हणजे गोवा नव्‍हे'; Article 370 च्या दिग्दर्शकाची गोमंतकीय चित्रपटसृष्टी, पर्यटनाबद्दलची परखड मते वाचा

IFFI 2024: जर आपली कला आपल्याला विकता आली तर गोमंतकीय चित्रपटसृष्टीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही, असे मत प्रसिद्ध गोमंतकीय दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी व्‍यक्त केले. मला खरा गोवा जगाला दाखवायचा आहे, असेही ते म्‍हणाले.
Aditya Jambhale At IFFI 2024
Aditya JambhaleDainik Gomantak
Published on
Updated on

Article 370 Director About Goa Film Industry And Tourism At IFFI 2024

गंगाराम आवणे

गोव्याला नाटक, चित्रपटांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. संस्कृती, परंपरेच्या अनुषंगाने देखील आम्ही समृद्ध आहोत. परंतु गोव्यासारख्या लहान राज्यात स्पर्धेची कमरता आहे. त्यासोबतच, चित्रपट आणि नाटक ज्याप्रमाणे कला आहे, त्यासोबतच व्यवसायही आहे. जर आपली कला आपल्याला विकता आली तर गोमंतकीय चित्रपटसृष्टीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही, असे मत प्रसिद्ध गोमंतकीय दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी व्‍यक्त केले. मला खरा गोवा जगाला दाखवायचा आहे, असेही ते म्‍हणाले.

ज्यावेळी मी कला अकादमीतील स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो, त्यावेळी ३० गट सहभागी असायचे. परंतु मी २०१३ साली जेव्हा पुण्यात ‘सकाळ’ करंडकमध्ये सहभाग घेतला, तेव्हा तेथे २६६ गटांनी सहभाग घेतला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी आपण स्पर्धेत उतरतो, त्यावेळी आपण कोठे आहोत, काय करायला हवे याची आपल्याला जाणीव होते, असे जांभळे म्हणाले.

आपण चित्रपट काढतोय त्यासाठी सरकारी मदत मिळेल का ही वृत्ती न ठेवता आपल्याला कोणीच मदत करणार नाही असाच विचार करून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर आपल्याला यश मिळेल असेही जांभळे यांनी स्‍पष्‍ट केले.

समुद्रकिनारे, मौजमजा म्‍हणजे केवळ गोवा नव्‍हे

ज्यावेळी मी इंजिनीयरिंगचे शिक्षण घ्यायचो, त्यावेळी माझी अभिनयाची भूक नाटकांनी कायम ठेवली. सुरूवातीच्या काळात मी इफ्फीत सहभागी होत असे, त्यावेळी मी रांगेत थांबून प्रतिनिधी पास मिळवित असे. परंतु २०१८ साली इंडियन पॅनोरमाची सुरवात माझ्या ‘खरवस’ लघुचित्रपटाने झाली. त्या घटनेने माझे जीवन बदलले. गोवा म्हणजे केवळ समुद्रकिनारे, निसर्ग आणि मौजमजा एवढे मर्यादित नाही तर त्या पलीकडे देखील गोवा आहे, जो या जगाला माहित नाही. तो गोवा जगाला दाखवायचे माझे स्वप्न असल्याचे जांभळे यांनी सांगितले.

Aditya Jambhale At IFFI 2024
Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

‘आर्टिकल ३७०’ हा प्रेरणादायी चित्रपट

‘आर्टिकल ३७०’ हा राजकीय थरार चित्रपट आहे. यावर प्रचारक चित्रपट म्हणून अनेकांनी टीका केली. परंतु भारताला संपूर्णतः एक करणाऱ्या घटनेवर आधारीत हा राजकीय चित्रपट आहे. त्‍यात कुठेही चित्रीकरणात अतिशयोक्ती करण्यात आलेली नाही. उलट हा चित्रपट पाहून आजच्या तरुणाईला पंतप्रधान कार्यालयात, सचिवालयात काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे समाधान असल्याचे जांभळे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com