Nehru's Tribal Wife: 'तो हार ठरला शाप,' जाणून घ्या कोण होत्या 'नेहरूंच्या आदिवासी पत्नी'

Budhni Manziaine: बुधनी यांना आयुष्यभर बहिष्काराचा फटका सहन करावा लागला कारण त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे तिच्या समाजातील लोकांनी हे पाऊल उचलले होते.
Budhni Manziaine Nehru's Tribal Wife
Budhni Manziaine Nehru's Tribal WifeDainik Gomantak
Published on
Updated on

Nehru's Tribal Wife Budhni Manziaine passes away:

झारखंडमधील "नेहरूंची आदिवासी पत्नी" बुधनी मांझियान यांचे स्मारक व्हावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे. अनेक वर्षे त्यांच्या जमातीने बहिष्कृत केलेल्या बुधनी यांचे नुकतेच निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.

बुधनी यांना आयुष्यभर बहिष्काराचा फटका सहन करावा लागला कारण त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे तिच्या समाजातील लोकांनी हे पाऊल उचलले होते.

खरे तर 1959 मध्ये एका धरणाच्या उद्घाटनाच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरूं येणार होते. ते पानशेत धरणाच्या उद्घाटनासाठी येत होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. जिल्ह्यातील सर्व बडे अधिकारी या कामात गुंतले होते.

काय आहे प्रकरण?

पंडित नेहरू हे नेहमीच त्यांच्या चौकटीबाहेरच्या विचारसरणीसाठी ओळखले जात होते; धरणाचे बांधकामात केलेल्या मजुरांनीच त्याचे उद्घाटन करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे पंतप्रधान नेहरूंच्या उपस्थितीत त्यावेळी १५ वर्षांच्या असलेल्या बुधनी मांझियान यांनी बटण दाबून पानशेत धरणाचे उद्घाटन केले.

तेव्हा कोलकाता येथून प्रकाशित होणाऱ्या 'स्टेट्समन' आणि 'आनंद बाजार पत्रिका'सह अनेक वृत्तपत्रांनी पंतप्रधान नेहरूंसोबतचे त्यांचे छायाचित्र आणि उद्घाटनाच्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केल्या. त्यानंतर बुधनी यांची देशभरात चर्चा होऊ लागली.

कोण होत्या बुधनी मांझियान ?

बुधनी या संथाल जमातीच्या होत्या. या समाजातील लोकांचे असे मत होते की, धरणाच्या उद्धाटनावेळी नेहरू यांनी बुधनी यांना हार घातला होता. नेहरूंनी बुधनी यांना हार घातला म्हणजे त्यांचा विवाह नेहरूंशी झाला आहे.

कारण हा विवाह समाजाच्या बाहेर झाला होता, त्याला समाजातील सदस्यांनी बहिष्कृत केले होते. त्यामुळे धरणाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नेहरूंनी गळ्यात घातलेला हार बुधनीसाठी शाप ठरला.

संथाल आदिवासी समाजात पुरुषाने स्त्रीला हार घातल्यास या विवाहाला मान्यता दिली जाते. जर कोणी समाजाबाहेर लग्न केले तर त्याला बहिष्कृत केले जाते.

या प्रकारानंतर बुधनी यांच्या गावात प्रवेशावरही बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी 15 वर्षांच्या असलेल्या बुधनी यांंना गावाबाहेर एका पडक्या घरात राहावे लागले.

चढ-उतारांनी भरलेले जीवन

बुधनी यांचे जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. धरणाच्या बांधकामादरम्यान त्यांची वडिलोपार्जित जमीन पाण्याखाली गेली होती. त्यांच्याकडे जमिनीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते.

मात्र, त्यानंतरही बुधनी हार मानली नाही. धरणाच्या बांधकामादरम्यान त्यांनी मजूर म्हणून काम केले. बुधनी या धरणाच्या पहिल्या कंत्राटी कामगारांपैकी एक होत्या.

5 डिसेंबर 1959 रोजी धरणाचे उद्घाटन झाले तेव्हा पंडित नेहरूंनी हार घालणे त्यांच्यासाठी मोठी समस्या ठरले. त्यांच्या गावाने व समाज्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकला.

1962 मध्ये, बुधनी यांना इतर अनेक डीव्हीसी कंत्राटी कामगारांसह कामावरून काढून टाकण्यात आले. नंतर त्या शेजारच्या बंगालमधील पुरुलियामधील सालटोरा येथे राहायला गेल्या आणि रोजंदारी कामगार म्हणून काम करू लागल्या.

तेथे, बुधनी एका कंत्राटी कामगार सुधीर दत्ता यांना भेटल्या, ज्यांनी तिला आश्रय दिला आणि नंतर तिच्याशी लग्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com