Panaji Smart City : ‘स्मार्ट सिटी’त बेसुमार भ्रष्टाचार

एल्विस गोम्स : केंद्र सरकारने चौकशी करावी
Goa Congress
Goa Congress Gomantak Digital Team
Published on
Updated on

Panaji Smart City : राजधानी पणजी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील भ्रष्टाचाराची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी आज केली आहे. गोम्स यांनी बुधवारी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय भिके आणि पणजी महिला गटाध्यक्ष लविनिया डिकॉस्ता उपस्थित होते.

गोम्स म्हणाले, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आली. भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने आपली हिंमत दाखवावी. केंद्रीय मंत्री पुरी यांनी सरकारचे मुखपत्र असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा वापर करून आमच्यावर आरोप केले आहेत.

Goa Congress
Goa Mining: खनिज वाहतुकीतील वर्चस्वासाठी दोन मंत्र्यांमध्ये चढाओढ, भर उन्हात वाहनचालकांनाही वेठीस धरण्याचा प्रकार

प्रत्यक्षात पणजीतील लोकांना भेटून त्यांना स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या निकृष्ट कामामुळे कसा त्रास होतो, हे विचारण्यात ते अपयशी ठरले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव, मुख्य सचिव, महापालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटीचे अधिकारी हे सर्व दोषी आहेत. ते मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे धाडस भाजप करणार नाही. बाबुश यांनी बरोबरच म्हटले आहे, की सल्लागाराला ८ कोटी रुपये विनाकारण दिले जातात. जेव्हा मंत्री भ्रष्टाचार कबूल करतात, तेव्हा भ्रष्टाचाराचे पुरावे देण्याची गरजच नाही.

Goa Congress
Goa State level Swimming: खेलो इंडिया राज्य प्रशिक्षणार्थींची जलतरणात छाप; 17 पदकांची लयलूट

काळे झेंडे दाखविणार

निकृष्ट कामाचा फायदा कोणाला होईल, हे आम्हांला माहीत आहे. स्मार्ट सिटीच्या कामाचा पर्दाफाश प्रसारमाध्यमांनी केला आहे. या मंत्र्याला (पुरी) मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. ते पुन्हा येथे आल्यास आम्ही त्याला काळे झेंडे दाखवू, शहरात धोक्याची क्षेत्रे कोठे आहेत? हे दाखवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काळे झेंडे घेवून फिरू, असे पणजीकर म्हणाले.

Goa Congress
Mumbai-Goa Vande Bharat Express: गोमंतकीयांसाठी मुंबई अवघ्या साडेसात तासांवर

पुरींनी शहरात पदयात्रा काढावी

काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडणार असून स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचारावर गप्प बसणार नाही. आम्ही जे काही आरोप केले आहेत ते बिनबुडाचे नाहीत. तिथे काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही श्री पुरी यांना शहरात पदयात्रा करायला सांगितले होते. पण तसे न करताच ते दिल्लीला पळून गेले, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com