Goa State level Swimming: खेलो इंडिया राज्य प्रशिक्षणार्थींची जलतरणात छाप; 17 पदकांची लयलूट

कांपाल केंद्रातील जलतरणपटूंची वर्षभरातच चमकदार कामगिरी
Goa State level Swimming
Goa State level Swimming Dainik Gomantak
Published on
Updated on

State level Swimming competition: कांपाल येथील खेलो इंडिया राज्य क्रीडा उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थींनी फोंड्यात झालेल्या ३४व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत छाप पाडली. गोवा जलतरण संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा फोंडा येथील जलतरण तलावात झाली.

Goa State level Swimming
Wrestlers Protest: मास्टर ब्लास्टरच्या घराबाहेर लावले पोस्टर! कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी वाढला दबाव

पदक विजेते खेळाडू ः

आहिल शेख - 1 सुवर्ण, 2 रौप्य, 2 ब्राँझ, पूर्णा शिकेरकर - 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 ब्राँझ, आरोही बोर्डे - 1 सुवर्ण, 1 रौप्य, २ ब्राँझ, आर्यन शर्मा - 4 सुवर्ण, 2 ब्राँझ, आकर्ष मथियन - 3 सुवर्ण, 2 रौप्य, 1 ब्राँझ, श्याम सिग्नापूरकर - 2 सुवर्ण, 4 रौप्य, 1 ब्राँझ,

आदी सिग्नापूरकर - 2 सुवर्ण, 2 ब्राँझ, निरंजनी बोर्डे - 3 सुवर्ण, 4 रौप्य, 1 ब्राँझ, सौम्या पालयेकर - 1 सुवर्ण, 2 ब्राँझ, पूर्वा नाईक - 1 रौप्य, अनुष्का रॉड्रिग्ज - 1 रौप्य, 1 ब्राँझ, श्रीजा गाड - 2 सुवर्ण, 3 रौप्य, राहुल पाटील - 3 सुवर्ण, 1 रौप्य, साहर्ष परब - 1 ब्राँझ, सक्षम नाईक - 1 रौप्य, पूजा राऊळ - 3 सुवर्ण, 3 रौप्य, 1 ब्राँझ, सौरभी नाईक - 4 सुवर्ण, 2 रौप्य.

Goa State level Swimming
IPL 2023: दोन षटकारानं 9 लाखाच्या गाडीसाठी आला एवढ्या लाखाचा खर्च!

श्रीजा गाड, आहिल शेख, पूर्णा शिकेरकर, आर्यन शर्मा, आकर्ष मथियन, आरोही बोर्डे, निरंजनी बोर्डे, श्याम सिग्नापूरकर यांनी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नव्या स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली.

गोव्यातील खेलो इंडिया राज्य क्रीडा उत्कृषटता केंद्र गतवर्षी जुलै महिन्यात सुरू झाले. वर्षभरात जलतरणातील मुख्य प्रशिक्षक टी. ए. सुजित यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शानदार कामगिरी प्रदर्शित केली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com