Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mapusa Civic Issues: पाच वर्षांत रोजगारनिर्मिती करणारा एकही मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला नसून, रवींद्र भवनचा प्रकल्प तीन दशकांपासून रखडलेला आहे.
Goa Politics
Mapusa Civic IssueDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: भाजपप्रणित सत्ताधारी पालिका मंडळ आणि स्थानिक आमदारांना म्हापशाच्या विकासाचा विसर पडल्याचा आरोप करत उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकार आणि पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. गेल्या पाच वर्षांत रोजगारनिर्मिती करणारा एकही मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला नसून, रवींद्र भवनचा प्रकल्प तीन दशकांपासून रखडलेला आहे.

तसेच व्यावसायिक संकुल पूर्ण होऊनही सुरू न झाल्याने विकासाच्या दाव्यांची पोलखोल होत असल्याचे त्यांनी म्हटले.गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नार्वेकर यांनी मान्सूनपूर्व कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे यंदाही खोर्ली, मुख्य बाजारपेठ आणि इतर सखल भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी काँग्रेस नेते सलमान खान उपस्थित होते.

Goa Politics
Goa Congress: काँग्रेस अजूनही सुस्त, भाजपची बुथवर फौज फिक्स! गोव्याच्या रणांगणात कशी होणार लढत?

शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना नार्वेकर म्हणाले की, अंमली पदार्थांची विक्री आणि वेश्याव्यवसायासारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये वाढ होत आहे. अलीकडील गँगवॉरच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाडेकरू पडताळणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याने अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. अल्पसंख्याक संस्थांवर होत असलेल्या हल्ल्यांचाही त्यांनी निषेध केला.

राज्य सरकारने दरवर्षी दहा हजार रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तरुणांच्या हाताला आजही काम नसल्याचा दावा त्यांनी केला. म्हापसा पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहराचा विकास ठप्प झाला असून, ''स्टाफ सिलेक्शन कमिटी'' नसल्याने अनेक कायमस्वरूपी पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी अपात्र उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने भरती करून प्रशासन चालवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Goa Politics
Goa Congress: 2027 चा मास्टरप्लॅन की आत्मघातकी पाऊल? विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश चोडणकरांकडे धुरा; सत्तेसाठी काँग्रेसचा 'हाय-व्होल्टेज' डाव!

सांडपाणी थेट नदीत!

सलमान खान यांनी पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, शहरातील सांडपाणी थेट म्हापसा नदीत सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी कमालीचे प्रदूषित झाले आहे. बाजारपेठेत उभारलेला ईटीपी (सांडपाणी) प्रकल्प अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. त्यातच भरपावसात बाजारपेठेतील रस्त्यांवर डांबर टाकण्याचे अजब काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. तब्बल ६ कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com