Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

Goa Politics News: राज्यातील विरोधक सत्ताधारी भाजप विरोधात एकवटले असताना काँग्रेसवर आरोप का केला जातोय? असा सवाल लोबो यांनी उपस्थित केला.
Goa AAP News | Politics
APP Leader Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: २०२७ मध्ये गोव्यात सरकार स्थापन करण्याची आशा बाळगून असलेल्या आम आदमी पक्षाला अरविंद केजरीवाल राज्यात दौऱ्यावर असतानाच मोठा फटका बसला आहे. दक्षिण गोव्यातील पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाणावलीतील पॉल लोबो आणि सॅटरनिनो रॉड्रिग्ज यांनी राजीनामा दिला आहे. लोबो आणि रॉड्रिग्ज यांचा राजीनामा आमदार व्हेंझी व्हिएगस यांना मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या सात ते आठ वर्षापासून मी आणि माझे समर्थक आपसाठी काम करत आहोत. आम्ही दोन जिल्हा परिषद आणि एक आमदार निवडून आणले आहेत. सध्या राज्यातील सरकारचा ढीसाळ कारभार सुरु आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. अशा सत्तेला प्रश्न न करता अरविंद केजरीवाल काँग्रेसवर आरोप करतायेत. राज्यातील विरोधक सत्ताधारी भाजप विरोधात एकवटले असताना काँग्रेसवर आरोप का केला जातोय? असा सवाल लोबो यांनी उपस्थित केला.

Goa AAP News | Politics
Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

भाजपचा पराभव करण्याची क्षमता सर्वात मोठा असलेल्या पक्षात आहे. व्हेंझी यांनी केजरीवालांना सत्य परिस्थिती सांगण्याची गरज आहे, असे लोबो माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तर, रॉड्रिग्ज यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे कार्यकर्त्यांचे फोन उचलण्यास वेळ नाही, चर्चा करण्यास वेळ नाही, असा आरोप केला. दरम्यान, पक्ष कार्यालयातून माध्यमांशी बोलत असतानाच लोबो यांना फोन आला व त्यांना कार्यालयातून बाहेर जाऊन बोलण्यास सांगितले, असा दावा लोबो यांनी केला.

पक्षातील नेत्यांमधील उद्धटपणा कमी व्हायला हवा. बाणावलीत कोणताही विकास झालेला नाही, मतदारसंघातील नागरिकांनी देखील येथे कोणताही मोठा विकास झाला नसल्याचे सांगितले, असे लोबो म्हणाले.

केजरीवाल गोव्यात भाजपला सहकार्य करण्यासाठी आलेत, त्यांना गोव्याचे विकासाचे काही पडलेले नाही. त्यांचा अजेंडा केवळ काँग्रेसला संपविण्याचा आहे, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला.

Goa AAP News | Politics
U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौऱ्यात काँग्रेसवर सडकून टीका केली. राज्यात काँग्रेस आणि भाजप एकत्रपणे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा खाण व्यावसाय देखील मुख्यमंत्री सावंत यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचे केजरीवाल म्हणाले होते. यावरुन अमित पाटकर आणि अमित पालेकर यांच्या शाब्दिक युद्ध देखील पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com