Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Vinoo mankad trophy: विनू मांकड करंडक १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहीम गुरुवारपासून (ता. ९) सुरु होत असून संघासमोर खडतर आव्हान आहे.
Published on

पणजी: गोव्याच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक पातळीवर लक्ष वेधण्याची संधी मिळेल. विनू मांकड करंडक १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहीम गुरुवारपासून (ता. ९) सुरु होत असून संघासमोर खडतर आव्हान आहे.

अष्टपैलू यश कसवणकर याच्याकडे गोव्याचे नेतृत्व आहे. गतमोसमातील अनुभवाचा यश याला यंदा फायदा होऊ शकतो. गोव्याचा एलिट अ गटात समावेश आहे. विदर्भ, बडोदा, आंध्र, ओडिशा व गुजरात हे या गटातील अन्य संघ आहेत. सामने हरियातील झज्जर व लाहली येथे खेळले जातील.

मोसमपूर्व तयारीच्या उद्देशाने गोव्याचा १९ वर्षांखालील संघ गुजरात क्रिकेट संघटनेच्या, तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या स्पर्धेत खेळला होता. या दोन्ही स्पर्धांत संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.

गतमोसमातील विनू मांकड करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याला पाचपैकी दोन सामने जिंकता आले होते, तर तीन लढतीत पराभव पत्करावा लागला. यंदा गटात मातब्बर प्रतिस्पर्धी असल्यामुळे गोव्याच्या संघाचा कस लागेल.

Goa Cricket Team
Vinu Mankad Trophy: ओडिशाला पाच विकेट राखून हरवत गोव्याच्या मोहिमेची विजयाने सांगता

संघ असा ः शंतनू नेवगी, दिशांक मिस्कीन, यश कसवणकर (कर्णधार), अभियश सूर्यवंशी, आराध्य गोयल, समर्थ राणे, अनुज यादव, चिगुरुपती व्यंकट, पियुष देविदास, आदित्य कोटा, वेदांत डब्राल, अथर्व भंडारी, जय कांगुरी, प्रियांशू वर्मा, शिवेन बोरकर, नितीन घाडी, सार्थक भिके.

Goa Cricket Team
Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

वेळापत्रक ः तारीख ९ ऑक्टोबर - विरुद्ध विदर्भ, तारीख ११ ऑक्टोबर - विरुद्ध बडोदा, तारीख १३ ऑक्टोबर - विरुद्ध आंध्र, तारीख १५ ऑक्टोबर - विरुद्ध ओडिशा, तारीख १७ ऑक्टोबर - विरुद्ध गुजरात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com