खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

Khari Kujbuj Political Satire: फोंडा नगरपालिकेची नगरसेवकांची खास बैठक आवश्यक गणपूर्ती न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली.
Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूजDainik Gomantak
Published on
Updated on

गेले नगरसेवक कुणीकडे?

फोंडा नगरपालिकेची नगरसेवकांची खास बैठक आवश्यक गणपूर्ती न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली. वेळ ११ वाजताची होती; पण ११.४५ वाजले तरी नगरसेवकांची आवश्यक उपस्थिती न झाल्यामुळे बैठकीला पूर्णविराम देण्यात आला. या बैठकीत दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती; पण आता या चर्चेकरता पुढील बैठकीची वाट पाहावी लागणार आहे. फोंड्याला आधीच आमदार नाही, त्यात परत नगरसेवकांची अशी वृत्ती. त्यामुळे फोंडावासीयांची अवस्था सध्या ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी झाल्यासारखी वाटायला लागली आहे. आणि यामुळेच फोंड्यात ‘गेले नगरसेवक कुणीकडे?’ यावर चर्चा रंगताना दिसायला लागली आहे.

..म्‍हणून तानावडेंनी ताणला ‘तो’ विषय

भाजपचे राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तसे चाणाक्ष नेते. राज्‍यात भाजपला सलग दोनवेळा सत्ता मिळवून दिल्‍याची दखल घेत मोदी-शहांनी त्‍यांना राज्‍यसभेची खासदारकी बहाल केली. या तानावडेंनी गुरुवारी संसद अधिवेशनात राज्‍यातील खाणग्रस्‍तांच्‍या आर्थिक स्‍थितीचा आढावा घेतला. २०१२ मध्‍ये खाणी बंद पडल्‍यानंतर अनेकांची कर्जे थकली. अशांपैकी अनेकांनी पुढील काळात सरकारच्‍या ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेचा (ओटीएस) लाभ घेत, ती भरलीदेखील; परंतु त्‍यांच्‍या क्रेडिट इतिहासात थकित कर्जांची माहिती असल्‍याने बँका त्‍यांना कर्जे देण्‍यास टाळाटाळ करीत आहेत. यावर केंद्र सरकारने तोडगा काढावा, अशी मागणीही त्‍यांनी केली. राज्‍य विधानसभेची निवडणूक अवघ्‍या सात ते आठ महिन्‍यांवर येऊन ठेपलेली आहे. शिवाय क्रेडिट इतिहास आणि सिबिल स्‍कोअरमुळे कर्जे मिळत नसल्‍याच्‍या तक्रारीही खाणग्रस्‍तांकडून वाढत असून, विधानसभा निवडणुकीत त्‍यांचा फायदा उठवण्‍याच्‍या मुख्‍य हेतूनेच तानावडेंनी हा विषय ताणल्‍याचे बोलले जात आहे.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

दावा फोल ठरणार?

‘मगो’ पक्षाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आपल्‍या पक्षापेक्षा भाजपच्‍याच अधिक जवळ पोहोचल्‍याचे चित्र गेल्‍या काही वर्षांत वारंवार दिसून आलेले आहे. सध्‍या भाजप आणि ‘मगो’ युतीत आहेत. येत्‍या विधानसभा निवडणुकीतही आमची युती कायम राहील, असा ठाम विश्‍‍वास ‘मगो’चे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर व त्‍यांचे बंधू तथा मंत्री सुदिन ढवळीकर या दोघांनाही आहे. मांद्रे मतदारसंघ आमचाच असून, जीतही ‘मगो’सोबत आहेत. त्‍यामुळे भाजप ही जागा ‘मगो’लाच सोडेल, असे दीपक ढवळीकर ठामपणे सांगत आहेत; परंतु येत्‍या निवडणुकीत भाजपला स्‍वबळावर सत्तेत आणण्‍याचा निर्धार करून मैदानात उतरलेले मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक जीतना भाजपात आणून मांद्रेची जागा स्‍वत:च्‍याच पदरात पाडून घेणार, अशी चर्चा मांद्रे आणि पेडणेत सुरू झाली आहे.

कुशावती जिल्हा मुख्यालय सासष्टीत?

चुकीच्या नीतीमुळे कधी-कधी सुविधाच असुविधा ठरायला लागतात. राज्य सरकारने घाईघाईने ‘कुशावती’ या तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना करून त्यासाठी स्वतंत्र जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. मात्र, कुशावतीचे मुख्यालय कुठे आहे? हा संभ्रम मात्र अजून कायम आहे. केपेकर कुशावती जिल्हा मुख्यालय केपेत व्हावे यासाठी आवाज उठवीत होते, तर कुडचडेची जनता जिल्हा मुख्यालयासाठी कुडचडे योग्य असल्याचा दावा करून कुशावती जिल्हा मुख्यालय कुडचडेत करण्याची मागणी करीत होते. काणकोणकर तर आपल्याला दक्षिण गोव्यातच ठेवण्याची मागणी करीत होते. मात्र, एकूण वस्तुस्थिती पाहता कुशावतीचे जिल्हा मुख्यालय तूर्तास दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालय असलेल्या माथानी साल्ढाणा इमारतीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. कुशावती जिल्ह्यासंबंधी बैठका व इतर कामकाज माथानी साल्ढाणा इमारतीतूनच चालत आहे. सरकारने जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना केली होती. लोकांचे श्रम व वेळ वाचणार, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, जिल्हा मुख्यालयाचे कामकाज जर दक्षिण गोव्यातून चालणार असेल तर नवीन जिल्हा स्थापनेचा फायदा काय?

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

धीरयोवाल्यांना मेसेज...

सासष्टीत धीरयो काही केल्या थांबण्याचे नावच घेण्यास तयार नाहीत. पोलिसांना आधीच सेटिंग केल्याने कुठल्याही अडथळ्याशिवाय या झुंजी होतात. मात्र, आता सोशल मीडिया पॉवरफुल झाल्याने व अशा धीरयोंची बातमी व्हायरल होत असल्याने पोलिसांनी जरा सबुरीने, असा प्रेमळ संदेश या रेडेवाल्यांना दिला आहे, अशी आतील गोटातील खबर आहे. तुम्ही धीरयो आयोजित करा. मात्र, एवढ्या लवकर नको. थोडी कळ सोसा, अशी सूचना पोलिसांनी केलेली आहे. लवकरच पावसाळी विधानसभा अधिवेशन आहे, हे त्यामागील एकमेव कारण आहे, बरे का!

गेले नगरसेवक कुणीकडे?

फोंडा नगरपालिकेची नगरसेवकांची खास बैठक आवश्यक गणपूर्ती न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली. वेळ ११ वाजताची होती; पण ११.४५ वाजले तरी नगरसेवकांची आवश्यक उपस्थिती न झाल्यामुळे बैठकीला पूर्णविराम देण्यात आला. या बैठकीत दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती; पण आता या चर्चेकरता पुढील बैठकीची वाट पाहावी लागणार आहे. फोंड्याला आधीच आमदार नाही, त्यात परत नगरसेवकांची अशी वृत्ती. त्यामुळे फोंडावासीयांची अवस्था सध्या ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी झाल्यासारखी वाटायला लागली आहे. आणि यामुळेच फोंड्यात ‘गेले नगरसेवक कुणीकडे?’ यावर चर्चा रंगताना दिसायला लागली आहे.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: बोरकरांची 'गुपिते' खोलकरांकडे!

एल्टनला झाली आठवण!

आपल्या राजकारण्यांना निवडणूक जवळ आली की सगळ्या समस्यांची व सगळ्या शिल्लक कामांची आठवण येते. तत्कालीन आमदार बाबू कवळेकर यांनी आमदार असताना भव्य अशा केपे पोलिस स्थानकाच्या इमारतीच्या कामास सुरवात केली होती. बाबूंच्या कार्यकाळात या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. आपण पुन्हा आमदार झाल्यावर अवघ्याच दिवसांनी पोलिस इमारतीचे उद्‌घाटन करणार, अशी घोषणा कवळेकर यांनी केली होती. मात्र, बाबूंना जनतेने घरी बसविल्यास व एल्टन डिकॉस्टा आमदार बनल्यास पाच वर्षे पूर्ण व्हायला आली. मात्र, पोलिस स्थानक इमारतीचे काम अडून पडले आहे. केपे पोलिस एका चिंचोळ्या जागेत काम चालवीत आहेत. केपेत जर जिल्हा मुख्यालय पाहिजे तर पोलिस अधीक्षक कार्यालय स्थापन होणारच! असे असताना पोलिस ठाण्याची इमारत पूर्ण का होत नाही? असे म्हणत एल्टननी आता जनतेला घेऊन मोर्चा काढण्यास सुरवात केली आहे. पंधरा दिवसांत इमारतीचे काम पुन्हा सुरू न झाल्यास केपे बंद करण्याचा इशारा दिला आहे. एल्टनबाब हे करायला आपल्याला पाच वर्षे का लागली? असा प्रश्न जनता विचारायला लागली आहे.

पणजी-भाटलेतील खड्ड्यांचे कवित्व

पणजीतील भाटले परिसरातील मळा ते तांबडी माती अशा मार्गावरील खड्ड्यांचे कवित्व कधी संपणार, हे काही कळत नाही. खड्डे होतात म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाते पेव्हर्स टाकून रस्त्याची तात्पुरती डागडुजी करीत आले आहे; परंतु पावसामुळे पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पेव्हर्स दबले गेले असून त्याठिकाणी खड्डे निर्माण झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत, त्यात प्रभाग १३ व १४ चा समावेश आहे. प्रभाग १४ चे नगरसेवक ज्या ठिकाणी राहतात, त्याच इमारतीला लागून असलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. याच खड्ड्यातून हे नगरसेवक आपल्या आलिशान गाडीतून ये-जा करतात, त्यामुळे कदाचित त्या गाडीमुळे खड्ड्यांची तीव्रता त्यांना जाणवत नसावी. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेचा कालावधी पाहिल्यास या कामाविषयी नगरसेवक महानगरपालिका आणि ‘साबांखा’कडे किती पाठपुरावा करीत असतील, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काहीही म्हणा, पोटभर वाढा

‘ते’ मतदान केंद्र हलवा!

‘मतदार राजा’ असे मतदाराला संबोधले जाते खरे; मात्र प्रत्यक्षात मतदार ‘राजा’ नव्हे ‘गंगू तेली’सारखा आहे, हेच सत्य. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील कुलवाडा प्रभागाचे एक मतदान केंद्र ज्या ठिकाणी चालते ते जनावरांनाही ठेवण्यायोग्य नाही. पालिकेच्या गोदामात चालणाऱ्या या मतदान केंद्राची स्थिती पाहिल्यास नकोच ते मतदान, असे म्हणण्याची वेळ मतदारांवर येते. मतदान केंद्रावर नियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल तर विचारूच नका. एका बाजूने घाणीचे साम्राज्य व दुसऱ्या बाजूने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात चालणारे ते मतदान केंद्र इतरत्र हलविण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र, निवडणुकीत करोडो रुपये खर्च करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांचे लक्ष या मतदान केंद्रावर जातच नाही. यंदा जर हे मतदान केंद्र न बदलल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा येथील मतदारांनी दिला आहे. आता पाहूया जिल्हाधिकारी मॅडम काय निर्णय घेतात.

देवदूत ठरले टॅक्सीचालक!

दारूच्या नशेत नदीत पडायचे, मग स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यांनी जीव धोक्यात घालायचा आणि शेवटी उपचारांचा खर्चही समाजाच्या यंत्रणेने उचलायचा... हा कसला शहाणपणा? पणजीत गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता मांडवी नदीत एक मद्यपी पडला आणि त्याला टॅक्सी चालकांनी वाचवले. मौजमजेच्या नावाखाली बेफिकिरीची परिसीमा गाठणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, प्रत्येक वेळी नशीब आणि कोणीतरी देवदूतासारखे धावून येतीलच असे नाही.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

न्यायालयही ‘वेटिंग’वर?

काही पंचायत सचिवांची कमालच म्हणायची! न्यायालयाने फेब्रुवारीत अहवाल मागितला; पण ऑगस्ट उजाडला तरी अहवालाचा पत्ता नाही. त्यामुळे गावात आता नवा प्रश्न चर्चेत आहे- हे सचिव नेमके कुणाला घाबरतात तरी काय? कारण न्यायालयाचा आदेशही फाईलमध्ये ठेवून धूळ खात पडला आहे. लोक म्हणतात, सामान्य माणूस नोटीस आली की धावपळ करतो; पण इथे मात्र न्यायालयालाच वाट पाहावी लागते! आता न्यायालय पुढे काय भूमिका घेणार, सचिवांना चांगलाच दणका देणार की आणखी एक संधी देणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र गावात ही चर्चा चांगलीच रंगली आहे.

नक्की दोष कुणाचा?

रस्त्यावर अपघात झाला की पहिला प्रश्न पुढे येतो, ‘चालकाचा निष्काळजीपणा होता का?’ पण. गुरुवारी खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा जीव गेल्याची बातमी आल्यानंतर चर्चा थोडी वेगळ्याच वळणावर गेली. आता लोक विचारतात, दोष नेमका चालकाचा, खड्ड्याचा की खड्ड्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेचा? रस्त्यांवरील खड्डे आता जणू कायमस्वरूपी रहिवासीच झाले आहेत. वाहनचालक रोज त्यांच्याशी लपंडाव खेळत असतात; पण या खेळात जीव गेला तर जबाबदारी कोणाची? दोषी कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आणि हो... ‘जेन-झी’मध्ये तर वेगळाच सुरू आहे. यावरून आता पुन्हा आंदोलन होणार का? आणि यावेळी कुणा मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होणार का? याचे उत्तर येणारे दिवसच देतील.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: मराठ्यांकडून विचार 'नोटा'चा ?

बेफिकीरीचा वेग

अटल सेतूवर दिव्याचा खांबच ‘ब्रेक’ ठरला; पण वाहनचालकांच्या बेफिकिरीचा वेग मात्र अजूनही कमी व्हायचे नाव घेत नाही. नियमांना धाब्यावर बसवून धावणाऱ्या चालकांमुळे आधी खांब पडतो, मग टायर वेगळे होतात, तेल रस्त्यावर सांडते आणि शेवटी वाहतूक कोंडीत अडकून सामान्य नागरिकच भरडला जातो. अपघातानंतर पोलिस, रुग्णवाहिका आणि पंचनामे वेळेवर पोहोचतात; पण अपघात होण्याआधी शिस्त, वेगावर नियंत्रण आणि जबाबदारी मात्र कधीच पोहोचत नाही, हीच खरी शोकांतिका!

दारूचा घोट, वेगाचा झोत...

भाड्याच्या गाडीचे स्टेअरिंग हातात आले की काहीजणांना गोव्याचे रस्ते म्हणजे स्वतःची खासगी रेसिंग ट्रॅकच वाटू लागते. आसगावमध्ये एका चालकाने गाडीतच मद्यप्राशन करत भरधाव वाहन चालविणे, रिकामा डबा रस्त्यावर फेकणे आणि दुसऱ्या वाहनाला धडक देण्याची वेळ आणणे, हा केवळ बेफिकिरीचा नव्हे तर कायद्यालाच उघड आव्हान देण्याचा प्रकार आहे. मात्र, यावेळी नशेपेक्षा ‘स्मार्ट’ ठरल्या त्या महिलेच्या कॅमेरा असलेल्या चष्म्याने! रस्त्यावर डोळेझाक करणाऱ्यांपेक्षा आता नागरिकांचे डोळे आणि कॅमेरे अधिक जागे झाले आहेत. नियम मोडणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, गोव्यात आता फक्त वाहतूक पोलिसच नाहीत, तर प्रत्येक सजग नागरिकही तुमच्या बेफिकिरीचा साक्षीदार ठरू शकतो.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

मौलिकता विरुद्ध चोरबाजार

नाटककार रमाकांत पायाजी यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली. त्या काळात त्यांनी गोवेकरांची सांस्कृतिक भूक भागवली. विशेष म्हणजे त्यांची मौलिक मराठी संहिता. अगदी साधे सुटसुटीत स्थानिक बाजाचे शैलीचे संवाद. शब्दबंबाळ नव्हे. त्यांची नाटके म्हणजे गोव्याची नाटके होती. तीन तास कुटुंबे जमखण वा हातरीवर बसून या नाटकात बुडून जात. भाषा, कथानकावरच नाटक खुलायचे. हल्लीचे युवा लोक इथे हात मार, तिथे पंजा मार, यू-ट्यूबवरील हा तुकडा ओरबाडून काढ व त्याचे कपयाळे करून रसिकांच्या माथी लेखक म्हणून हा चोरीचा माल खपवतात. चोरीच्याही ६४ कला व १४ विद्या असाव्यात. अशाप्रकारे या संहिता विणल्या जातात. कलेच्या दालनातील पावित्र्याचे हे अवमूल्यन होय. रमाकांत पायाजी यांनी नाटकाची सेवा केली. त्यांच्या सृजनशीलतेचा आदर्श घेऊन भ्रष्टांनी आता तरी सुधारावे.

विद्वज्जड नव-पाणिनी

आपणाला हे पाणिनी समजतात काय? अशा चहाड्या, चुगल्या करण्याची खालची पातळी काहीजणांना असते. मुळात आपण पाणिनीचे व्याकरण समजून घेतले का? चार्वाक, सुश्रुत हे शब्द उच्चारले म्हणजे त्यांचा सखोल अभ्यास आहे, असे बिलकुल होत नाही. नासलेल्या, कुजलेल्या मनांचे ते प्रतीक असते. हा पाणिनी, तो कालिदास, असे उपहासाने, कुत्सितपणे संबोधणे म्हणजे एक तर आपण फार फार उच्च स्तरावरचे प्रतिभावान असले पाहिजे किंवा रक्तद्वेषाने भरले असले पाहिजे. वेळोवेळ रक्त-तपासणी करून घ्या म्हणून उपदेश केला जातो तो यामुळे. प्रातिभ-अंकुर हे पावसाने आत उमलत नाही. ते मुळात असायला हवे उपजत. समजो कुणी चार्वाक पाणिनी, का ही विरोधा भक्ती रात्रंदिन ध्यानी मनी?

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

रंगमंचाचे पावित्र्य!

बिपीन मंगेशकर हे आत्यंतिक गुणी कलाकार. दीर्घ अनुभवी. हल्ली कलेच्या प्रांगणात काही मुले धुडगूस घालतात, त्यांनी बिपीनकडून नाटकाचे क्राफ्ट, ब्लॉकींग, आकृतीबंध, रूपबंध, एकजिनसीपणा, अभिनयाचे कंगोरे, खोली शिकून घ्यावी. नम्रतेने प्रश्न विचारून शंकानिरसन करून घ्यावे. रामायणातील लढाई संपली होती. राम म्हणाले, लक्ष्मणा, धारातीर्थी पडले आहेत खूप विद्वान. प्राण जाण्याअगोदर त्यांच्याकडून अनुभवाचे तंत्र-मंत्र शिकून घे. लक्ष्मण गेला. रावण व इतर कोणच बोलले नाहीत. परत फिरला. रामाने उपदेश केला. पायाकडे जा. आर्जवाने, अदबीने विचार. विनम्र विद्यार्थी होऊन. लक्ष्मणाला चूक कळली. तो गेला, शिकून आला. गैरप्रकारे रंगमंच विद्रूप करणारी काही मुले जन्माला आली नव्हती, त्याअगोदर बिपीनराव रंगमंचावर चढले होते. यांची पापकर्मे कितीही असो. टंटेमारी वाल्यांचा वाल्मिकी होऊ शकतो. बिपीन व तत्सम रंगसाधकांची संगत धरल्यास.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com