Goa Agriculture | Marigold
Goa Agriculture | MarigoldDainik Gomantak

Goa Agriculture: कृषी क्षेत्रात सांगे तालुक्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल!

Goa Agriculture: मात्र, आता कृषी उत्पादनाला योग्य दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
Published on

Goa Agriculture: सांगे मतदारसंघ फळे, फुले आणि भाजी उत्पादनात नक्कीच स्वयंपूर्ण झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण येथे सर्व प्रकारची फळभाजी, पालेभाजी आणि इतर पिके उत्पादित होऊ लागली आहेत. फलोत्पादन महामंडळाकडून शेतकऱ्यांची भाजी विकत घेतली जाते. मात्र, कृषी उत्पादनाला योग्य दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सांगेत टोमॅटो, कोबी, ढबू मिरची, काकडी, दुधी भोपळा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. वांगी, घोसाळी, कंदमुळे, सुरण, अळू, माडी अशा भाज्या विपुल प्रमाणात खेडोपाड्यात उत्पादित होऊ लागल्या आहेत. पालेभाज्या, हिरवी मिरची, मसाला यापासून स्ट्रॉबेरीपर्यंत पिकापर्यंत सांगे मतदारसंघ अग्रेसर आहे.

Goa Agriculture | Marigold
Modi Exhibition: पणजीत कला व सांस्कृतिक भवन येथे 'मोडी'चे प्रदर्शन

डोंगरावर फुलवले भाजीचे मळे

सांगेच्या जमिनीत कोणतेही पीक उगवते, हे कृषी खात्याने सिद्ध केले आहे. साळजिणी, तुडव, वेर्ले या डोंगराळ भागात कोणतेही पीक उगवते. प्रयोग म्हणून लावलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या फलोत्पादन महामंडळ खरेदी करून राज्यात विक्रीसाठी पाठवते.

नेत्रावळीची काकडी दररोज टनांच्या हिशेबाने खरेदी केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दर मात्र कमीच आहेत. यात सरकारने लक्ष घालून थोडी वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Goa Agriculture | Marigold
Goa Bridge: बोरी पूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार!

स्ट्रॉबेरीपासून मसाल्यांपर्यंत सर्व काही

सांगेच्या मातीत कोणतेही बी रुजायला घातले कि ते हमखास उगवते, हे स्ट्रॉबेरीसारख्या पिकाने सिद्ध केले आहे. साळजिणीसारख्या गावात बासमती तांदूळ होऊ शकतो, तर पाट-नेत्रावळीत काळा तांदूळ होतो. डोंगराळ भागात चांगल्या प्रतीचा टोमॅटो, कोबी, नवलकोल (गड्डे), ढबू मिरची होते. जायफळ, दालचिनी (तिखी), पत्री, मिरी, वेलची पासून व्हेनिलासारखे उत्पादन घेण्यात येते.

झेंडूच्या फुलांना मागणी

सांगेत मेरीगोल्डसारखी फुले मोठ्या प्रमाणात होतात. कृषी खात्याने सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध करून दिल्याने दसरा-दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेण्यात येते. ऑर्किडचे उत्पादनही घेण्यात येते.

Goa Agriculture | Marigold
Vishwajit Rane: आरोग्य खाते नागरिकांना सर्वोच्च सुविधा पुरवण्यासाठी कटीबद्ध

कोरोना महामारीपूर्वी सांगे भागात ऑर्किड फुलांचे मळे फुलविले होते. ती फुले राज्यात आणि राज्याबाहेरही बऱ्यापैकी जात होती. पण कोरोना काळात ग्राहक नसल्याने हा व्यवसाय मागे पडला. पर्यायाने ऑर्किडचे उत्पादन घटले.

दैनंदिन रोजगार: प्रत्येक हंगामात रोजगार निर्मिती करण्याइतकी पिके सांगेत उत्पादित होत आहेत. त्यामुळे स्थानिकांना खास करून महिला वर्गाला दैनंदिन रोजगार उपलब्ध होत आहे. पावसाळा सुरू होताच गावठी भाजीपाला, काकडी, दोडका, चिबूड विक्री सुरू होते.

Goa Agriculture | Marigold
Goa Pollution: संस्कृती प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्या- विनायक खेडेकर

संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी गावठी गूळ निर्मिती सुरू केली आहे. त्याची विक्री खुल्या बाजारात केली जाते. दिवाळीनंतर कारंदे, कणगे, अळू, माडी, सुरण यांची विक्री केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com