Modi Exhibition: पणजीत कला व सांस्कृतिक भवन येथे 'मोडी'चे प्रदर्शन

मोडी लिपी ही मराठी भाषेची एक लिपी आहे.
Modi-Marathi Exhibition
Modi-Marathi ExhibitionDainik Gomantak

Modi-Marathi Exhibition: कला व सांस्कृतिक भवन, पणजी येथे प्राचीन अशा मोडी लिपीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. समाजकल्याण, जलवाहतूक आणि पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते आज (सोमवारी) या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. या प्रदर्शनात नागरिकांना मोडी आणि मराठी भाषेतील प्राचीन दस्ताऐवज पाहता आणि वाचता येतील. मोडी लिपी ही मराठी भाषेची एक लिपी असून, तिचा वापर प्रामुख्याने मध्ययुगीन महाराष्ट्रात शीघ्र लेखनासाठी झाला.

या प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी अभिलेखागार आणि पुरातत्व खात्याचे संचालक दीपक बांदेकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Modi-Marathi Exhibition
Mulayam Singh Yadav: तीनवेळा मुख्यमंत्री, एकदा संरक्षणमंत्री पण, पंतप्रधानपदाची शर्यत हरले

मोडी लिपीचे प्रदर्शन 16 ऑक्टोबर म्हणजेच येत्या रविवारपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

मोडी लिपीचा जवळपास 700 वर्षांचा इतिहास सांगितला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोडी लिपीचा वापर राजलिपी म्हणून केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com