Goa Bridge: बोरी पूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार!

Goa Bridge: केंद्र सरकारने भली मोठी थैलीच गोवा सरकारला प्रदान केली असल्याने अडून पडलेले रस्तेविषयक अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
Goa Bridge
Goa BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bridge: राज्यातील महामार्ग चौपदरीकरणाबरोबरच आवश्‍यक त्या ठिकाणी पूल उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते महामार्ग आणि दळणवळण खात्याने तब्बल 2228 कोटी रुपये संमत केल्याने राज्यातील रस्त्यांची स्थिती नक्कीच बदलणार असल्याचे सिद्ध झाले असून या एवढ्या मोठ्या रकमेत बोरी पुलाच्या कार्यान्वितीसाठी प्राथमिक स्वरूपातील कामाला 310 कोटी रुपये निर्धारित केल्यामुळे बोरीच्या नव्या पुलाचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले आहे.

रस्ते महामार्गासाठी केंद्र सरकारने भली मोठी थैलीच गोवा सरकारला प्रदान केली असल्याने अडून पडलेले रस्तेविषयक अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विशेष म्हणजे दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी - आगशी पूल येत्या डिसेंबरपर्यंत खुला होणार असल्याने या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कमालीची सुधारणार आहे.

Goa Bridge
Vishwajit Rane: आरोग्य खाते नागरिकांना सर्वोच्च सुविधा पुरवण्यासाठी कटीबद्ध

त्याचबरोबर फोंडा व मडगावला जोडणाऱ्या नवीन बोरी पुलाच्या कार्यान्वितीसाठीही लवकरच कार्यवाही होणार असल्याने दक्षिण गोव्यातील आणखी एक महत्त्वाचा पूल साकारला जाणार आहे. बोरीतील पोर्तुगीजकालीन पूल धोकादायक झाल्यानंतर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.

या नवीन पुलाला आता चौतीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा पूलही कमकुवत झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा पूल वाहतुकीस बंद झाला तर दक्षिण गोव्यातील मडगाव - फोंड्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. त्यामुळेच या पुलाला समांतर दुसरा नवीन पूल उभारण्यासाठी मागच्या पाच वर्षांपासून सरकार दरबारी बोरी ग्रामपंचायत तसेच इतर संस्था मागे लागल्या होत्या.

Goa Bridge
Goa Pollution: संस्कृती प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्या- विनायक खेडेकर

मात्र नवीन पुलाच्या कामाचा योग जुळून येत नव्हता, पण दोन वर्षांपूर्वी नवीन पुलाच्या कामासाठी मातीचे परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला व तो सरकारला पाठवल्यानंतर पुन्हा निधीचा अडसर आला.

मात्र, आता बोरी नवीन पुलाच्या बायथाखोल - ढवळी ते पाणीवाडा व मुरमेपर्यंतच्या रस्त्यासाठी जमीन संपादन व इतर बांधकामासाठी तब्बल 310 कोटी रुपये निर्धारित करण्यात आल्यामुळे बोरीच्या नवीन पुलाच्या कामाला चालना मिळाली आहे. बोरीच्या नवीन पुलामुळे दक्षिण गोव्यात आणखी एक सक्षम असा सेतू तयार होईल, अशा प्रतिक्रिया अंत्रुज महालातून व्यक्त होत आहेत.

Goa Bridge
ATM Robbery : बांबोळीत अज्ञातांनी फोडले एटीएम; अधिक तपास सुरू

जलवाहिनीचा पूल कोसळल्यानंतर...

बोरीतील जलवाहिनी वाहून नेण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी उभारलेला लोखंडी पूल गेल्या वर्षी जूनमध्ये कोसळला. या पुलाचा नदीच्या मध्यभागातील सांगाडा कोसळला होता. त्यामुळे वाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या विद्यमान पुलाला काही धोका निर्माण झाला आहे काय, याचाही आढावा संबंधित खात्याने घेतला, पण तशाप्रकारचा कोणताच धोका नसल्याचे या खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

वेर्णासाठी चौपदरी रस्ता

बोरीहून वेर्णाला जाण्यासाठी चौपदरी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, बोरीच्या नवीन पुलाला हा चौपदरी रस्ता जोडण्याचे काम शिल्लक राहिले आहे. नवीन पूल साकारल्यानंतर वेर्णा रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे वेर्णा औद्योगिक वसाहत तसेच मुरगावला जाण्यासाठी हा महामार्ग सोयिस्कर ठरणार आहे.

Goa Bridge
Illegal Casino In Goa: पेडणेत अवैध कसिनोचं पेव; गोवा फॉरवर्डकडून पोलखोल

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री-

बोरीच्या नवीन पुलासाठी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असताना पूर्वीच नियोजन केले होते. बायथाखोल ते बोरी पुलापर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद असल्याने त्यातच दोन्ही बाजूंनी घरे व दुकाने असल्याने तेथून वाहतूक करणे कठीण झाले आहे. त्यामुळेच नवीन पुलाची योजना पुढे आली आणि त्यासाठी नियोजन करण्यात आले. पुलासाठी निधीची आवश्‍यकता होती, ती आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच हा पूल साकारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com