Vishwajit Rane: आरोग्य खाते नागरिकांना सर्वोच्च सुविधा पुरवण्यासाठी कटीबद्ध

आरोग्य अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या सुचना
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे तालुक्यातील नागरिकांना या पुढे आरोग्यांच्या समस्यातून सुटण्यासाठी प्रशासन अधिक सक्षमपणे आपली भुमिका पार पाडेल असे मत आरोग्य,वन, नगरनियोजन आणि बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी विधान केले आहे. ते आज पेडणे मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पेडणे आरोग्य केंद्राच्या समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

(Health Minister Vishwajit Rane promises health services at Pernem)

Vishwajit Rane
Butterfly Beach: निसर्ग सौंदर्याचाअनोखा मेळ असलेल्या 'बटरफ्लाय बीच'ला तुम्ही भेट दिलीत का?

यावेळी मंत्री राणे यांनी आरोग्य सुविधा पुरवण्याबाबत काय - काय करता येईल यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी गरोदर माता, तसेच वेगवेगळे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णवाहीका सुविधा देता येईल का ? असे विचारल्यानंतर त्यांनी नुकतंच वाळपई तालुक्यात रुग्णवाहीकांचे केलेले लोकार्पणाचे उदाहरण देत सर्वांसाठी अशा सोई - सुविधा पुरवण्यास सरकार नियोजन करत असून यापूढे ते शक्य होईल असे ते म्हणाले.

Vishwajit Rane
Mauvin Godinho : बार मालकांवर आता मद्यपींचा भार; तळीरामांना घरी पोहोचवावं लागणार

यावेळी पेडणे मतदार संघासाठी 108 वाहन उपलब्ध करुन देत असल्याचं आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सुचना देत यंत्रणा बदण्यासाठी आपण अधिक सक्रियरित्या प्रयत्नशिल राहणे आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले.

राणे यांनी पेडणे तालुक्यातील लहान मुले, महिला यांच्यासाठी एक वेगळी आरोग्य यंत्रणा तयार केली जाऊन समाजातील या घटकाचे आरोग्य अधिक सक्षम होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातील यामध्ये गरोदर मातांना नियमित तपासणीकरिता वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचं ते म्हणाले. तसेच तालुक्यासाठी आवश्यक अशी यंत्रणा अद्याप पुरवणे आवश्यक आहे. त्यामध्ये आरोग्य तज्ज्ञ आणि इतर यंत्रणा पुरवण्यासाठी आपण सकारात्मकरित्या प्रयत्नशिल असून त्या लवकरात लवकर पुरल्या जातील असे ही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com