Goa Pollution: संस्कृती प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घ्या- विनायक खेडेकर

Goa Pollution: गोव्याची संस्कृती इथल्या मातीशी निगडित आहे.
Goa Pollution
Goa PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Pollution: गोव्याची संस्कृती इथल्या मातीशी निगडित आहे. त्यामुळे गोमंतकाच्या सांस्कृतिक ठेव्यात गोवा आणि इथल्या मातीशी निगडित सण, उत्सव, परंपरा हा मोठा वारसा आहे. तो जपा, त्याचे संवर्धन होण्यासाठी कार्यशाळा राबवा. विशेष म्हणजे आज संस्कृती प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ते रोखण्यासाठी प्रयत्नशील व्हा, असे आवाहन ‘पद्मश्री’ विनायक खेडेकर यांनी केले.

पर्वरी सम्राट क्लबच्‍या अधिकारग्रहण सोहळ्‍यात खेडेकर बोलत होते. सुकूर पंचायत सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सूकुर सरपंच सोनिया पेडणेकर, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, गटाध्यक्ष संजय वालावलकर, मावळत्या अध्यक्ष रश्मी हळदणकर, नूतन अध्यक्ष राजमोहन शेट्ये, उपसरपंच माया केणी, पंच साची मांद्रेकर, सर्वेश हळर्णकर, राजन पार्सेकर यांचीही उपस्थिती होती.

Goa Pollution
Goa Temple: फोंड्यातील झरेश्‍वर देवस्थानचा यंदा अमृतमहोत्सवी सोहळा

रश्मी हळदणकर यांनी स्‍वागत केले तर सचिव रिया राणे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संजय वालावलकर यांनी नवीन सम्राट सदस्यांना शपथ दिली. शैलेश बोरकर यांनी नूतन संचालक मंडळाला शपथ दिली. आरती गावडे यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन गिरीश साळगावकर यांनी केले तर उषा पुनाजी यांनी आभार मानले.

Goa Pollution
Goa Garbage: मडगाव रिंग रोड बनले कचऱ्याचे 'डार्क स्‍पॉट'

रोहन खंवटे, पर्यटनमंत्री तथा आमदार-

पर्वरी सम्राट क्लबचे कार्य कौतुकास्‍पद आहे. त्‍यामुळे रसिकांमध्ये उत्साह संचारतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्‍हणूनच सम्राट क्लब हा गोव्याच्या सांस्कृतिक चळवळीचा एक प्रमुख स्त्रोत म्हणावा लागेल. या क्‍लबच्‍या कार्याला माझ्‍या शुभेच्‍छा. तसेच आपली सांस्कृतिक चळवळ उत्साहाने पुढे चालविण्यास क्लबला माझे पूर्ण सहकार्य असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Safety Goa
Goa Crime Branch Investigation
Oil Spill Road Accident Goa
 Goa land ,Environment Protection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com