Goa Congress Protest भारतीय स्टेंट बँक व जीवन विमा महामंडळाचे एकूण 20 हजार कोटी रुपये अदानी ग्रुपला पंतप्रधान मोदी सरकारने दिल्याचे लोकसभेत आवाज उठविल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने राज्य करणारे भष्ट्राचारी जुमला पार्टीने अन्याय केला आहे.
मोदी सरकारने लोकशाही विरोधात जाऊन राहुल गांधींच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना खासदारी पदावरून अपात्र केले आहे. या अन्याया विरुद्ध अखिल भारतीय काँग्रेस समिती गप्प राहणार नसून भ्रष्ट मोदी सरकार विरोधात संपूर्ण देशात आंदोलन छेडणार आहे.
गोव्याच्या भाजप सरकारने मोदीच्या इशार्यावरुन अदानी ग्रुपचा कोळसा मुरगाव बंदरात तीन पटीने वाढवून, संपूर्ण मुरगाव तालुक्याला प्रदूषणाच्या विळख्यात टाकलेले आहे.
यासाठी राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने सामान्य जनतेच्या घरावर बुलडोझर फिरवून कोळसा आयात करण्यासाठी दुपदरी रेल मार्ग बनवित असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
कांग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेच्या खासदारकी पदावरून हुकूमशाही पद्धतीने अपात्र केल्याच्या निषेधार्थ, गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मुरगाव तालुक्यातील वास्को येथील मुरगाव नगरपालिका इमारती समोर भाजप सरकार विरोधात सत्याग्रह आंदोलन केले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या समवेत वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा, उपाध्यक्ष सुनिल कवठणकर,सुभाष फळदेसाय, सरचिटणीस कॅप्टन विरीयतो फर्नाडीस, ओलेन्सीयो सिमाँईश, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसोझा, गोवा महिला कांग्रेस अध्यक्ष बिना नाईक, माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, उलारीको रॉड्रिगीस, सुचिता शिरोडकर,माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष योगिता पार्सेकर, वास्को काँग्रेस गटाध्यक्ष अँड. मॅलविन फर्नाडीस, दाबोळी काँग्रेस गराध्यक्ष वसंत नाईक, कुठ्ठाळी काँग्रेस गराध्यक्ष पिटर डिसोझा, चिखलीचे पंच फ्रान्सिस नूनीस, नगरसेवक मथायस मोन्तेरो, जेनिफर आल्मेदा, राजेश स्वामी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष पाटकर म्हणाले की, केंद्र सरकारने राहुल गांधी विरोधात षडयंत्र रचण्या मागचे मुख्य कारण म्हणजे, राहुल गांधीने कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यन्त काढलेली पदयात्रा.
यामुळे राहुल गांधी यांना लोकसभेतून षडयंत्र करून अपात्र केले आहे. या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेस समिती सर्व तालुक्यात भ्रष्ट्राचारी जुमला पार्टी विरुद्ध सत्याग्रह आंदोलन करणार आहे.
माजी आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले कि, मोदी हुकूमशाही पद्धतीने देशाचे राजकारण चालवीत असून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता योग्य जागा दाखवतील.
मोदींच्या सहकार्याने गोवा सरकारने मुरगाव बंदरात अदानीला तीन पटीने कोळसा वाढवून दिलेला आहे.
यामुळे संपूर्ण वास्कोला प्रदूषणा टाकले आहे.मुरगाव तालुक्यातून पुन्हा एकदा कांग्रेस पक्ष बळकट होऊन, येणारी लोकसभा निवडणुकीत बढत मिळविणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमॉईश यांनी सांगितले की, राज्य सरकार दुपदरी रेल मार्ग करून फक्त अदानीला फायदा करीत आहे.
यासाठी केंद्र सरकारने एमपीटीचे एमपीए केले असा आरोप सिमॉईश यांनी केला. सरचिटणीस कॅप्टन विरीयातो यांनी भाजप हा देशाला संपविणारा पक्ष असल्याची ठिका केली. देशातील हुकूमशाही संपविण्याचा कट मोदी करीत आहे.
पण याविरोधात काँग्रेस पक्षा बरोबर इतर 18 पक्ष केंद्रातील भ्रष्ट्र भाजप सरकार विरोधात उभा राहिला आहे. माजी नगराध्यक्ष चोपडेकर यांनी सांगितले की, राज्य भाजप सरकारने इतर मागास वर्गीयावर अन्याय करून त्याना सरकारी सवलीतून दूर ठेवले आहे.
याला पुर्णपणे जबाबदार राज्य भाजप सरकार बरोबर केंद्र सरकार असल्याची ठिका चोपडेकर यांनी केली. वास्को येथील सत्याग्रह आंदोलनात सर्वाचे स्वागत उपाध्यक्ष सुभाष फळदेसाय तर आभार वास्को गटाध्यक्ष मॅलविन फर्नाडीस यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.