PFI- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India) या देशव्यापी संघटनेवर बंदी घातल्यानंतर गोव्यात या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कित्येकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा आरोप असलेल्या फातोर्डा येथील एका पीएफआय कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच संबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात माहिती दिलीय.
आरोपी अल्ताफ हुसेनसह पीएफआय आणि त्यांचे साथीदारआणि समर्थक यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे. तसेच या प्रकरणी अल्ताफ सय्यद आणि त्याच्या जवळच्या 23 साथीदारांची कसून चौकशी करण्यात आली आहे.
तपासादरम्यान अल्ताफ सय्यद हा 'वुई फॉर फातोर्डा' या राजकीय गटालाही निधी देत असल्याचे समोर आले असून यासंबंधीचा तपास अजूनही प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटना बेकायदेशीर असल्याचे काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने घोषित केल्यावर या संघटनेशी संबंधित असलेल्यांची देशभरात धरपकड सुरू केली असून सुमारे दीडशेहून अधिक नेते-कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.