Goa Budget 2023 : अर्थसंकल्प तरतुदींची अंमलबजावणी करण्यात अधिकारी कमी पडत नाहीत - डॉ. प्रमोद सावंत

एजन्सीमार्फत घेतला जातो आढावा
Dr. pramod sawant
Dr. pramod sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Budget 2023: अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात अधिकारी कमी पडत नाहीत. कामे करून घेणे हे अनेक अधिकारी पंचायत पातळीवर उपस्थित राहून काम करतात.

अधिकारी हे काम करण्यासाठी असतात, त्यांच्याकडून काम करून घेणे हे आमचे कौशल्‍य असते, असे मुख्‍यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

Dr. pramod sawant
Goa Budget 2023 : अर्थसंकल्प तरतुदींची अंमलबजावणी करण्यात अधिकारी कमी पडत नाहीत - डॉ. प्रमोद सावंत

बुधवारी गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्‍हणाले, अर्थसंकल्पातील योजनांच्‍या अंमलबजावणीसाठी आम्ही नियमित आढावा बैठक घेतो. किती काम झाले, किती राहिले ते समजते.

Dr. pramod sawant
CM Pramod Sawant Interview: खाण लिलावातूनच भरीव महसूलप्राप्ती : मुख्यमंत्री

कोविड काळात ज्या सतर्कतेने आम्ही काम केले, त्याचपद्धतीने आजही काम सुरू आहे. ‘आयएएस’ व ‘जीपीएस’ अशा दोन पातळ्यांवरील अधिकारी सतत कार्यरत आहेत.

Zsxdfgसुटी असूनही दर शनिवारी सकाळी १० ते १ या वेळेत पंचायत पातळीवर स्वयंपूर्ण मित्र उपस्थित राहतात. त्यामुळे अनेक अडचणी दूर होत आहेत.

एजन्सीमार्फत घेतला जातो आढावा

अर्थसंकल्पांतील तरतुदीची अंमलबजावणी निश्‍चित होणार आहे. त्यासाठी एजन्सीमार्फत आढावा घेतला जातो. किती कार्यवाही झाली, किती राहिली याचा विचार केला जातो. प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली जाते. अर्थसंकल्पातील योजना, तरतुदींबरोबरच केंद्र सरकारच्या योजनाही आहेत. उदा. मच्छीमारांसाठी योजना, बायोगॅस योजना. त्‍यांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.

Dr. pramod sawant
Economics News : चला पाहुया गोवा अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा

साधनसुविधांवर योग्यप्रकारे निधी खर्च होण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, दर्जात्मक काम व्हावे, उत्तम विकास व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही बंद असलेले सांकवाळचे कला भवन, इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ विद्यापीठाला दिले. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्‍हर्सिटीसाठी गेस्ट हाउस वापरात आणले. वापर नसलेल्या इमारती, दुकाने लिजवर देणे, विकणे ही प्रक्रिया सुरू केली आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com