Economics News : चला पाहुया गोवा अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा

गोव्याला ‘आयटी हब’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक आणण्यासह ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट.
Pramod Sawant
Pramod Sawant Gomantak Digital Team
Published on
Updated on

आरोग्य

  • यंदा आरोग्य खात्यावर १९७०.२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा निधी गत वर्षापेक्षा १८ टक्के जास्त आहे.

  • गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासह राज्यातील आरोग्य सेवा वाढविण्यावर भर.

  • क्षयरोग विभाग आणि रक्तपेढी उभारण्यात येणार आहे.

  • मुख्यमंत्री विमा योजनेतंर्गत दिनदयाळ सामाजिक सुरक्षा योजनेत बदल करत ५ लाखांपर्यंतची वाढ. उत्पन्न मर्यादेतही ८ लाखांपर्यत वाढ.

  • दक्षिण गोवा रुग्णालयात आयसीयू विभाग अत्याधुनिक करणार.

  • दोन्ही जिल्ह्यांत स्वतंत्र नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली जाईल.

  • आयुष योजनेंतर्गत डिसेंबर २०२३ पर्यंत ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येईल.

  • कुंकळ्ळी आणि कांदोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याबरोबर साखळी येथे ऑप्थाल्मिक युनिट सुरू केले जाईल.

  • विविध वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

  • दंत महाविद्यालयासाठी ४५ कोटींची तरतूद असून यातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १५ कोटींचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात येईल.

सार्वजनिक बांधकाम खाते

  • एकूण २६८७. ५४ कोटी रुपयांची तरतूद. यंदा २३ टक्के वाढ.

  • केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्गांच्या उभारणीकरिता १५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

  • राज्य सरकारच्या खर्चातून अनमोड -मोले चौपदरी मार्गासाठी १५०० कोटी.

  • संजीवनी कारखाना ते खांडेपार मार्गासाठी ६०० कोटी. वेर्णा-कुठ्ठाळी मार्ग चौपदरीकरणासाठी ५५० कोटी.

  • साळावली जल प्रकल्‍पासाठी ३६७ कोटी, बोरी पुलाखाली गोलाकार रस्‍त्‍याची बांधणी असे २२२८. ७८ कोटींचे नियोजन.

  • विविध मार्गांच्या पुनर्बांधणीकरिता ३६३०.८५ कोटी रुपयांचा विकास आराखडा केंद्रीय मंत्रालयाकडे सादर.

  • यामध्येच नव्या बोरी पुलाची उभारणी करण्यात येणार आहे.

  • या खात्यांतर्गतील सुविधा सहज सोप्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मनुसार वन ॲप ऑल सर्व्हिसेस करण्यात येईल.

Pramod Sawant
Goa Economic Survey 2023 : विकासदरात 10.33 टक्के वाढ अपेक्षित : आर्थिक पाहणी अहवाल

माहिती आणि तंत्रज्ञान

  • गोव्याला ‘आयटी हब’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक आणण्यासह ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट.

  • सरकारी हमीदाराशिवाय स्टार्टअपसाठी सीएमआरवायमधून थेट कर्ज. कुठूनही काम करण्यासाठी

१२ समुद्रकिनाऱ्यांवर सी-हब. कृषी खाते

  • एकूण २७७.४७ कोटींची तरतूद.

  • मुख्यमंत्री प्रगत कृषी योजना कार्यान्वित.

  • भाताची आधारभूत किंमत २० वरून २२ रुपये, नारळ १२ वरून १५ रुपये.

  • काजूची आधारभूत किंमत १२५ वरून १५० रुपये.

  • स्थानिक फळझाडांच्या ३.४५ लाख रोपट्यांची यावर्षी लागवड.

  • नाचणीचे बियाणे विनामूल्य वितरण, शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांचे एकरकमी अनुदान

Pramod Sawant
Goa Economic Survey 2023: राज्याचा विकासदर 10.33 टक्के राहणार; आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज

प्रसिद्धी आणि माहिती खाते

  • एकूण ७६.४ कोटींची तरतूद.

  • प्रथमच मनोरंजन आणि जाहिरातविषयक धोरण ठरविणार.

  • माध्यम प्रतिनिधींसाठी पत्रकार भवनाची स्थापना.

समाज कल्याण खाते

  • एकूण ५०४.९८ कोटींची तरतूद

  • दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी ३५५. ८० कोटी.

  • पर्वरी येथे आंबेडकर भवनची उभारणी.

  • ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार.

  • अटल आसरा योजनेसाठी २० कोटींची तरतूद.

  • मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटी.

महिला आणि बालकल्याण खाते

  • एकूण ५०३.९५ कोटींची तरतूद. गतवर्षीपेक्षा १६.२ टक्क्यांनी वाढ.

  • गृहआधार योजनेसाठी २३०. ६० कोटी, लाडली लक्ष्मी योजनेसाठी ८५.८७ कोटी.

  • महिलांची सुरक्षा वाढवणार. महिलांना यापुढे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंतही काम करता येणार.

  • ममता योजनेंतर्गत मुलीला जन्म देणाऱ्या मातेस १ हजार रुपयांची आर्थिक मदत. यासाठी ६.१३ कोटींची तरतूद.

राजभाषा विभाग

  • एकूण २१.४५ कोटींची तरतूद

  • भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना ६.५९ कोटी

  • गोव्यात विश्व कोकणी संमेलनाचे आयोजन

  • प्रादेशिक भाषांसाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी ९ कोटी खर्चून ''गोंय भाषा भवन''चा प्रस्ताव

जलस्रोत खाते

  • म्हादई खोऱ्यात निरंकाळ येथे ११.२१ एमसीएम, काजूमळ येथे ४ एमसीएम, तातोडी येथे ५.७ एमसीएम क्षमतेचे पाणी प्रकल्प.

  • पाणी पुरवठ्यासाठी पाच ॲक्‍शन प्‍लानसाठी ६६३ कोटींची तरतूद.

  • १५० पाणथळ क्षेत्रांचे अमृत सरोवर मिशनअंतर्गत संवर्धन करणार.

  • साळ पाण्‍याच्‍या शुद्धीकरणासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद.

  • पर्वरी येथील खात्‍याचे कार्यालय तंत्रज्ञानात्‍मकदृष्‍ट्‍या अद्ययावत करणार.

  • तिळारी प्रकल्‍पाचा आढावा, नव्‍याने डागडुजी.

  • सांतिनेज नाला व मळा-पणजी येथे पूरप्रतिबंधक यंत्रणा.

Pramod Sawant
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला मोठा झटका, व्यापार तूट रोखण्याच्या प्रयत्नात बेरोजगारीचा भडका!

वीज खाते

  • अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी वीज खात्यासाठी.

  • एकूण ३८५६.३६ कोटींची तरतूद. यंदा २१.८८ टक्के अतिरिक्त निधी.

  • सौर ऊर्जासाठी ३०० मेगावॅट क्षमतेची यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव.

  • हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवून १० हजार हरित रोजगारांची निर्मिती करणार.

  • इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान योजना पुन्हा सुरू करणार, त्यासाठी २५ कोटींची तरतूद.

  • ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्‍ट सुरू करणार, त्‍यासाठी आयआयटी आणि ‘बिट्स’चे मार्गदर्शन.

  • साळगावात बायोमास प्रकल्‍प मे महिन्‍यात मार्गी : दक्षिण गोव्‍यातही साकारणार.

  • २५ ते ३० मेगावॅट सौरऊर्जेचे लक्ष्‍य : सरकारी इमारती, शाळांवर पॅनल बसवणार.

  • मांद्रेत ४० उपवीज केंद्र बांधणार.

  • वेर्णा येथे ११० केव्‍हीचा नवा ट्रान्‍स्‍फॉर्मर.

  • नव्‍या स्‍मार्ट मीटरची तरतूद.

  • कवळे, साळगावात नवी वीज केंद्रे.

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खाते

  • एकूण १२९.१९ कोटींची तरतूद. आधीच्या तुलनेत २१.५६ टक्क्यांनी वाढ.

  • अग्निशमन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एकूण ४४.०३ कोटींचा निधी मंजूर.

  • याअंतर्गत पेडणेतील अग्निशमन केंद्राचे स्थलांतर करण्यात येणार.

  • काणकोण अग्निशमन केंद्रासाठी नवीन जमीन शोधण्याचे काम सध्या सुरू.

  • डिचोली आणि वाळपई येथील अग्निशमनच्या कामांना गती देण्यात येणार आहे.

  • अति उंच इमारतींमध्ये अग्निशमन बचाव कार्यासाठी ४२ मीटर टर्न टेबल शिडी खरेदी करणार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com