Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा

Central Road Research Institute Report: गोव्यातील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी ध्वनी नकाशा, हॉटस्पॉट्सची ओळख आणि प्रतिबंधात्मक योजना या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय रस्ता संशोधन संस्थेने हा अहवाल सरकारसाठी तयार केला आहे.
Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Noise Pollution Gomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी: राज्यातील ध्वनिप्रदूषण ही वेगाने वाढणारी समस्या आहे, ज्याला वाहतूक, औद्योगिक उत्पादन, पर्यटन, आणि सांस्कृतिक कार्यक्रम कारणीभूत ठरत आहेत. राज्यात वाहतुकीचे प्रमाण जास्त असून, विशेषतः दुचाकी वाहनांचा (५९ टक्के) मोठा वाटा आहे.

आर्लेम सर्कल, कोलवा सर्कल आणि साळगाव जंक्शनसारख्या भागांमध्ये वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणामुळे आवाजाचा स्तर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे गोव्यातील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी ध्वनी नकाशा, हॉटस्पॉट्सची ओळख आणि प्रतिबंधात्मक योजना या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय रस्ता संशोधन संस्थेने हा अहवाल सरकारसाठी तयार केला आहे.

Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषणासंबंधित लोकांनी संस्थेला तक्रारी लिहिण्याचे आवाहन

या अहवालात म्हटले आहे, की पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर होणारे कार्यक्रम, कॅसिनो आणि नाईट क्लब यांच्या आवाजामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रांमध्ये ८०-९० डेसिबल आवाज नोंदवला जातो, तर दाबोळी आणि मोपा विमानतळांमुळेही ध्वनिप्रदूषण वाढत आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाज मापन, हॉटस्पॉट ओळख आणि नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना तयार केल्या आहेत. यात वाहतुकीचे नियमन, ध्वनी प्रतिबंधक भिंती आणि जनजागृती अभियानांचा समावेश आहे. ध्वनिप्रदूषणाचे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन व कठोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

गोव्यातील ध्वनिप्रदूषण ही गंभीर समस्या असून, तिच्यावर नियंत्रणासाठी सरकार, उद्योग, पर्यटन व्यवसाय आणि स्थानिक लोक यांची एकत्रित जबाबदारी आहे. वाहनांच्या योग्य व्यवस्थापनापासून पर्यावरणीय उपाययोजना राबवून प्रदूषण कमी करणे शक्य आहे. अहवालात सुचवलेल्या उपाययोजना अमलात आणल्यास गोव्याचे पर्यावरण संतुलित ठेवून पर्यटकांसाठीही एक चांगले वातावरण तयार करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Noise Pollution in Goa: ध्वनी प्रदूषणावर करडी नजर; नियंत्रणासाठी २७ अधिकाऱ्यांची नियुक्ती

ध्वनिप्रदूषणाची कारणे

वाहतुकीचे वाढते प्रमाण : राज्यात वाहतुकीच्या स्वरूपात दुचाकी वाहनांचा मोठा वाटा आहे (५९%). लहान गाड्या २२% तर मोठ्या गाड्या ६% आहेत. राष्ट्रीय महामार्ग ६६ आणि ४ अ तसेच इतर मार्गांवर दररोज १ लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. सकाळी १० ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ६) आर्लेम सर्कल, कोलवा सर्कल येथे दर तास १५ ते २० हजार वाहने ये-जा करतात.

पर्यटनामुळे होणारा आवाज : समुद्रकिनारे (कळंगुट, बागा, पाळोळे) आणि कॅसिनोमध्ये होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होते. पर्यटन हंगामात दररोज ५-७ डेसिबलचा वाढीव आवाज नोंदवला जातो.

औद्योगिक क्षेत्रातील आवाज : कुंडई, वेर्णा आणि वास्को येथील औद्योगिक परिसरांमध्ये यंत्रसामग्रीचा सतत वापर होतो. औद्योगिक झोनमध्ये सरासरी आवाज ८५-९० डेसिबल इतका नोंदवला जातो, जो आरोग्यासाठी धोकादायक आहे.

विमानतळांमुळे होणारा आवाज : दाबोळी आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विमानाच्या उड्डाणांमुळे ध्वनी पातळी ७०-८० डेसिबलपर्यंत पोहोचते. यामुळे आजूबाजूच्या निवासी भागांतील नागरिकांवर परिणाम होतो.

सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम : उत्सवांदरम्यान मोठ्या आवाजात साउंड सिस्टीमचा वापर होतो. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रात्रीच्या वेळी ध्वनिप्रदूषणात वाढ होते.

Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Noise Pollution: राजकीय आशीर्वादानेच किनाऱ्यांवर ध्‍वनिप्रदूषण, स्‍थानिकांचा आरोप; पोलिस यंत्रणा हतबल

सर्वसाधारण ध्वनी नियंत्रण उपाययोजना

उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३.५ मीटर उंच ध्वनी प्रतिबंधक भिंती बसवाव्यात.

जलस्रोतांजवळ पारदर्शक ध्वनी अडथळ्यांचा वापर करून दृश्यसौंदर्य टिकवावे.

ध्वनी अडथळ्यांचे नियमित निरीक्षण करून त्यांची कार्यक्षमता तपासावी.

शाळा, रुग्णालये यांसारख्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यावर बंदी घालावी.

किनारी भाग ध्वनिप्रदूषण नियंत्रण उपाययोजना

समुद्रकिनाऱ्यांवर पार्श्वसंगीत व वाहतूक व्यवस्थापनासाठी ध्वनी नियंत्रण नियम कडक करावेत.

रहिवासी भाग व समुद्रकिनाऱ्यांदरम्यान आवाज अडवणाऱ्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

ध्वनिप्रदूषण ९० डेसिबल्सच्या वर जाऊ नये यासाठी ऑनलाईन निरीक्षण प्रणाली बसवावी.

पर्यावरण संवेदनशील भागांमध्ये (जसे मोरजी किनारा) रात्रीच्या आवाजाला कडक नियंत्रणात ठेवावे.

Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Noise Pollution In Goa: गोव्यात संगीत पार्ट्यांवर चाप, ध्वनी प्रदुषणाबाबत खंडपीठाचा मोठा निर्णय

औद्योगिक क्षेत्रात ध्वनी नियंत्रणाच्या शिफारशी

डिझेल जनरेटर सेट व जड यंत्रसामग्रीच्या खाली २० मिमी जाडीचा पॉलीयुरेथेन स्तर बसवावा.

औद्योगिक क्षेत्रांमध्ये ध्वनी कमी करणारे तंत्रज्ञान वापरणे बंधनकारक करावे.

उद्योगांमध्ये ध्वनिप्रदूषण पातळी मोजण्यासाठी नियमित तपासणी करावी.

जंगल क्षेत्रांत ध्वनी नियंत्रण उपाययोजना

वळण असलेल्या रस्त्यांवर ३००-५०० मीटर लांब व ५ मीटर उंचीच्या ध्वनी प्रतिबंधक भिंती उभाराव्यात.

दाट झाडांपासून बनवलेल्या नैसर्गिक ध्वनी अडथळ्यांचा उपयोग करावा.

वाहनांची गती कमी ठेवण्यासाठी नियम लागू करावेत आणि वन्यजीवांसाठी हॉर्न वाजवण्यावर बंदी घालावी.

शहरी भागात ध्वनी नियंत्रण उपाययोजना

उड्डाणपूल आणि शाळा, रुग्णालय यांसारख्या संवेदनशील ठिकाणी ध्वनी शोषण भिंती बसवाव्यात.

ज्या ठिकाणी सौंदर्याचा विचार महत्त्वाचा आहे, तिथे पारदर्शक ध्वनी अडथळे बसवावेत.

घनदाट झाडे लावून आणि इमारतींवर ध्वनी शोषणासंबंधी सामग्री लावून आवाज कमी करावा.

Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Noise Pollution : ध्‍वनी डेसिबल मोजण्‍याची यंत्रणाच नाही कार्यरत

किनारी भागात ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे उपाय

समुद्रकिनाऱ्यांवर पार्श्वसंगीत व वाहतूक व्यवस्थापनासाठी ध्वनी नियंत्रण नियम कडक करावेत.

रहिवासी भाग व समुद्रकिनाऱ्यांदरम्यान आवाज अडवणाऱ्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

ध्वनिप्रदूषण ९० डेसिबल्सच्या वर जाऊ नये यासाठी ऑनलाईन निरीक्षण प्रणाली बसवावी.

पर्यावरण संवेदनशील भागांमध्ये (जसे मोरजी किनारा) रात्रीच्या आवाजाला कडक नियंत्रणात ठेवावे.

कॅसिनोमध्ये आवाज प्रदूषण नियंत्रणासाठी शिफारशी

संगीत प्रणालीखाली पॉलीयुरोथेन पॅड बसविणे; कमीतकमी २० मिमी जाडीच्या पॅडचा वापर केल्याने आवाज नियंत्रण व कंपने कमी होण्यास मदत होते.

जास्त आवाजाच्या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कानात बसवायचे प्लग किंवा आवाज कमी करणारे हेडफोन वापरण्याची शिफारस आहे.

कॅसिनोमधील कोपऱ्यांमध्ये जड पडदे लावणे व गालिचे वापरणे यामुळे आवाज नियंत्रण व कंपने कमी होण्यास मदत होते.

संगीत प्रणाली किंवा लाउडस्पीकरसारख्या उपकरणांभोवती आवाज अडथळे लावल्याने हवेतील आवाज व कंपने कमी होऊ शकतात.

Noise Pollution In Goa: गोव्याला ध्वनिप्रदूषणाचा विळखा! कॅसिनो, नाईट क्लब, समुद्रकिनारे 'हॉटस्पॉट'; केंद्रीय रिपोर्टमधून खुलासा
Noise Pollution : ध्वनी प्रदूषणाविरोधी तक्रारीला प्रशासनाकडून केराची टोपली

जर आवाज पातळी ९० डेसिबलपेक्षा जास्त झाली तर संगीत प्रणाली आपोआप बंद होईल, अशी यंत्रणा असावी.

१५ मिमी जाडीचे व ५ मीटर उंचीचे बॉलिकार्बोनेट शीट वापरून आवाज अडथळे तयार करणे.

कॅसिनो व्यवस्थापनाने नियमित आवाज मोजमाप करणे व उपकरणांजवळ आवाज पातळीची चाचणी घेणे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संलग्न ऑनलाइन प्रणालीद्वारे आवाज मर्यादा राखावी.

विशिष्ट शांत भागांमध्ये ध्वनी शोषक पॅनेल व मंद प्रकाश वापरणे यामुळे आरामदायी वातावरण निर्माण होईल.

किनारी भागात ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे उपाय

समुद्रकिनाऱ्यांवर पार्श्वसंगीत व वाहतूक व्यवस्थापनासाठी ध्वनी नियंत्रण नियम कडक करावेत.

रहिवासी भाग व समुद्रकिनाऱ्यांदरम्यान आवाज अडवणाऱ्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

ध्वनिप्रदूषण ९० डेसिबल्सच्या वर जाऊ नये यासाठी ऑनलाईन निरीक्षण प्रणाली बसवावी.

पर्यावरण संवेदनशील भागांमध्ये (जसे मोरजी किनारा) रात्रीच्या आवाजाला कडक नियंत्रणात ठेवावे.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पर्याय

वाहतुकीचे व्यवस्थापन : फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर बांधकाम; आर्ले सर्कलसारख्या गर्दीच्या जंक्शनवर ग्रेड सेपरेटर बांधल्याने आवाज कमी होऊ शकतो.

सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रोत्साहन : बसेस आणि मेट्रोसारख्या वाहतूक साधनांना प्राधान्य देणे.

ध्वनी प्रतिबंधक भिंतींचे बांधकाम : समुद्रकिनाऱ्यावर पारदर्शक ध्वनी प्रतिबंधक भिंती (उदा. कळंगुट, बागा) उभारणे, ज्यामुळे पर्यावरणीय व आर्थिक नुकसान कमी होईल.

औद्योगिक क्षेत्रांवरील नियंत्रण : यंत्रसामग्रीत ध्वनी प्रतिबंधक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योगांसाठी ध्वनी मर्यादा ठरवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी.

कायदेशीर उपाय : रात्री १० नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी, ध्वनी पातळी ओलांडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com