Noise Pollution In Goa: गोव्यात संगीत पार्ट्यांवर चाप, ध्वनी प्रदुषणाबाबत खंडपीठाचा मोठा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोव्यातील संगीत पार्ट्या आणि आणि आवजावर मर्यादा घातल्या आहेत.
Noise Pollution In Goa
Noise Pollution In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Noise Pollution In Goa: गोव्यातील पर्यटन हंगामाला सुरूवात झाली आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. कानठळ्या बसवणाऱ्या संगीत पार्ट्यांमुळे राज्यात ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोव्यातील (High Court of Bombay at Goa) संगीत पार्ट्या आणि आणि खुल्या मैदानातील आवाजावर मर्यादा घातल्या आहेत.

(Curb On Noise Pollution In Goa)

Noise Pollution In Goa
IRCTC Goa Tour Package: या ख्रिसमला करा गोव्याचा प्लॅन, IRCTC देतयं भन्नाट ऑफर

उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि दोन्ही जिह्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांना ध्वनी प्रदुषण उल्लंघनावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रात्री दहानंतर ठराविक मर्यादेच्या वरती आवज गेल्यास संबधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. याशिवाय दक्षिण व उत्तर पोलिस अधिक्षकांना 13 डिसेंबरपर्यंत अॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Noise Pollution In Goa
Pramod Sawant:'भारत जोडो'च्या बाता करणाऱ्यांनी पूर्वी गोवा भारताशी जोडण्यास विलंब केला- मुख्यमंत्री

ॲड. कार्लुस फेरेरा (Carlos Feriera) यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, "रितसर परवानगी घेऊन रात्री दहापर्यंत संगीत वाजवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. दहानंतर खुल्या जागेत संगीत वाजवण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. याची जबाबदारी पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. तसेच, 15 सण- उत्सव आहेत त्यासाठी संगीत चालवण्याची परवानगी घ्यावी लागेल."

अंजुना-वागादोर परिसरातील काही हॉटेल्समध्ये मोठ्या आवाजात गाणी- संगीत लावून उपद्रव केल्याच्या जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या भागात संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDMS) इव्हेंट, पार्ट्या सुरु असतात. याला या निर्णयामुळे चाप बसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com