Noise Pollution: राजकीय आशीर्वादानेच किनाऱ्यांवर ध्‍वनिप्रदूषण, स्‍थानिकांचा आरोप; पोलिस यंत्रणा हतबल

Loud Music: राज्यातील पर्यटन हंगाम सध्या पूर्ण क्षमतेने पुढे सरसावत आहे. किनारी भागातील शॅक्स, हॉटेल्स तसेच रिसॉर्टमधून होत असलेले ध्वनिप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्‍नशील आहे.
Goa Loud Music Issue
Goa Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa noise pollution

कळंगुट: राज्यातील पर्यटन हंगाम सध्या पूर्ण क्षमतेने पुढे सरसावत आहे. किनारी भागातील शॅक्स, हॉटेल्स तसेच रिसॉर्टमधून होत असलेले ध्वनिप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्‍नशील आहे. मात्र ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना मिळत असलेल्‍या छुप्‍या राजकीय आशीर्वादामुळे पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.

कळंगुटपासून बागा ते हणजूण-वागातोरच्या किनारी भागात शेकडोंच्या संख्येने पसारा मांडून बसलेल्या शॅक्स तसेच रेस्टॉरंटवाल्यांकडून पोलिसांचा डोळा चुकवून ध्वनिप्रदूषण करून कायद्याचा भंग होत आहे. विशेष म्हणजे रविवारी तसेच सुट्टीच्या दिवसांत अशा प्रकारांना ऊत येतो. परिणामी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी विचित्र स्थिती या भागातील पोलिसांची झालेली आहे. पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र या भागाचा दौरा केल्यास दिसून येते.

Goa Loud Music Issue
Goa Forest: गोव्याचे वनक्षेत्र वाढले की घटले? राज्‍य, केंद्राच्‍या आकडेवारीत मोठी तफावत

ध्वनिप्रदूषणाला पूर्णत: आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणेसह गोवा राज्य पर्यटक पोलिस आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकाऱ्यांना कामाला लावणे गरजेचे आहे, असे स्थानिक लोकांचे म्‍हणणे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कळंगुट तसेच हणजूण पोलिस यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी रात्री उशिरापर्यंत या भागात गस्त घालताना दिसतात. मात्र, पोलिसांची पाठ फिरताच शॅक्स रेस्टॉरंटसह अनेक हॉटेलवाल्यांकडून ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग होत असल्याच्या स्थानिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. प्रत्येक रैस्टॉरंटकडे पोलिस उभा करणे अशक्य असल्याने निदान यापुढे तरी वरील तिन्ही यंत्रणांनी एकत्रित येऊन काम केल्यास या भागातील ध्वनिप्रदूषण कमी होऊ शकते, असे स्थानिक सांगतात.

Goa Loud Music Issue
Noise Pollution: दणदणाट भोवला, GPCB ने 'आवाज'च बंद केला; गोव्यातील तीन रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

स्‍थानिक लोकही तेवढेच जबाबदार ; रवी हरमलकर

खरे पाहता किनारी भागातील बहुतांश व्यवसाय हे स्थानिक लोकांचेच आहेत आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु कालांतराने अधिक पैशांच्या हव्यासापोटी स्थानिकांनी किनारी भागातील आपला स्वत:चा धंदा, व्यवसाय परप्रांतीय लोकांच्या घशात घातला. त्यानंतर समस्यांनी डोके वर काढले. गर्भश्रीमंत दिल्लीस्थित लोकांनी गोव्यातील व्यवसायाचा ताबा मिळविताच मिळेल त्या मार्गाने पैसा कमावणे सुरू केले. त्यामुळेच कायद्याचे खुलेआम उल्लंघन होऊ लागले. किनारी भागातील आजच्या परिस्थितीला गोमंतकीय माणूस स्वत:च जबाबदार आहे. त्याचे खापर केवळ पोलिस यंत्रणेवरच फोडून चालणार नाही. राजकारणीसुद्धा तितकेच जबाबदार आहेत, अशी संतप्‍त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रवी हरमलकर यांनी व्‍यक्त केली.

कळंगुटपासून वागातोरपर्यंतच्या किनारी भागात शेकडोंच्या संख्येने कार्यरत असलेल्या हॉटेल्‍सवाल्यांवर अवघ्‍याच पोलिसांकडून नजर ठेवणे खूप कठीण गोष्‍ट आहे. नवीन वर्षाच्या आरंभापर्यंत येथील किनारी भागात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास ध्वनिप्रदूषण नियंत्रणात येऊ शकते.

बलभीम मालवणकर, अध्यक्ष-शापोरा फिशिंग बोट असोसिएशन

पर्यटन व्यवसाय वाढीमुळे रेव्ह पार्ट्यांनाही ऊत आला आहे. प्रत्‍येकजण पैशांच्या मागे लागला आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांनाही पैसे पाहिजेत आणि त्याविरोधात लढणाऱ्यांचा काही स्‍वार्थी समाजसेवकांचाही डोळा पैशांवरच असतो‌. राजकारण्यांचे चमचे पैशांच्या थैल्या गोळा करण्यासाठी खुलेआम फिरताना दिसतात. मात्र बळीचे बकरे बनविले जातात पोलिसांना.

मायकल डिसोझा, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com