
Noise Pollution : हरमल, पर्यटन हंगामात येथील किनारी भागात संगीत रजनीसाठी रात्री दहावाजेपर्यंत परवाने दिलेले आहेत. पण रात्री उशिरापर्यंत किंबहुना पहाटेपर्यंत पार्ट्या सुरूच असतात. विशेष म्हणजे ध्वनीचे डेसिबल वाढत आहे.
ते मोजण्याचे यंत्रच नसल्याने तसेच गेस्ट हाऊसेस रिकामी होत असल्याने व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हरमल किनारी भागात सध्या संगीत पार्ट्यांचा धूमधडाकाच सुरू आहे. भर लोकवस्तीत रात्री उशिरापर्यंत गोंगाट सुरू असतो. त्यामुळे रुग्णांना व ज्येष्ठांना भयंकर त्रास सहन करावा लागतोय. कर्णकर्कश आवाजाने हृदयाचे ठोके तर वाढतातच, शिवाय धरणीचा कंपही जाणवतो.
तक्रारी नाहीच
पर्यटन हंगाम नुकताच सुरू झाला असून व्यावसायिक स्थिरस्थावर होत आहेत. त्यात गेस्ट हाऊसेसमध्ये गेस्ट वास्तव्यास आहेत. त्यांनाही या पार्ट्यांचा खूप त्रास होतो. सरकारने रात्री दहावाजेपर्यंत संगीत वाद्ये वाजविण्यास मंजुरी दिली असली तरी त्याचे पालन कोणी करावे याचा स्पष्ट उल्लेख नाही.
पोलिसांत तक्रार दिल्यास ते तक्रारदाराचे नाव उघड करतात. त्यामुळे गेल्या वर्षी बराच हंगामा झाला होता. पोलिसांच्या कृतीमुळे स्थानिक लोक तक्रार द्यायला राजी नसतात, असे एका व्यावसायिकाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.