Goa News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत; वाचा दिवसभरातील घडामोडी

25 November 2024 Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
Goa News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत; वाचा दिवसभरातील घडामोडी
Published on
Updated on

मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत (बाळा) नाईक यांनी पूरग्रस्त सुमारे 350 शेतकऱ्यांना मदत दिली.

सायबर घोटाळ्याप्रकरणी 24 जण अटकेत!

गोवा पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रांचने झुआरी नगर येथे अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी 24 जणांना अटक केली. गुन्ह्यातील सर्व उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती डीजीपी आलोक कुमार यांनी दिली.

कळंगुट येथील चोरीप्रकरणी एकास अटक, 3 लाखांचा मुद्देमालही जप्त!

कळंगुट येथे झालेल्या चोरीप्रकरणी डी.एम. संतोष (27, कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली. 3 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची भेट!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारतरत्न आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

त्या 'मॅडम'ना पकडून देण्याचा सर्व जनतेचा निर्धार!

'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन लोकांचे लक्ष विचलीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न. पण 'मॅडम'ला पकडून देण्याचा सर्व जनतेचा निर्धार. आम्हीही ह्या मॅडमला पडकल्यावाचून राहणार नाही. पण ही मॅडम कोण त्याची पूर्ण माहिती आमच्या हातात येऊ द्यात. त्यानंतरच मी जाहीर भाष्य करेन. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंची प्रतिपादन.

बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थमधील २०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

भारतीय तटरक्षक दलाने अंदमानच्या समुद्रात एका मासेमारी बोटीतून सुमारे पाच टन ड्रग्ज पकडले आहेत. भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत जप्त केलेल्या अमलीपदार्थांपैकी हा सर्वात मोठा प्रसंग असण्याची शक्यता आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

महाराष्ट्रात भाजपच्या दणदणीत विजयाबद्दल गोव्याचे आरोग्यमंत्री मंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

ग्रामसभेनंतर कामुर्लीच्या उपसरपंच आणि त्यांच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी नुबर्ट फर्नांडिस याला अटक केली.

गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

मांद्रे पोलिसांनी एका रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट शोधून काढत त्याला परत केला. गोवा पोलिसांच्या तत्परतेबद्दल पर्यटकाने आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com