Vishwajeet Rane: रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज

Vishwajeet Rane: आरोग्यमंत्री‘आपत्कालीन’द्वारे होणार वापर; आठ रुग्णवाहिका सेवेत दाखल
 Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak

Vishwajeet Rane:

पॉवरग्रीड कॉर्पोरेशनने दिलेल्या 8 रुग्णवाहिकांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी (ता.12) पणजी येथील वनभवन येथे हिरवी झेंडी दाखविली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी गर्भवती महिला आणि हृदय रोगाशी संबंधित रुग्णवाहिकांची गरज व्यक्त केली. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होईल.​

मंगळवारी वनभवन-पणजी येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमादरम्यान राणे म्हणाले की, या रुग्णवाहिकांचा मुख्य उद्देश म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत वेळेत पोहोचण्यामध्ये सुधारणा करणे हा आहे. पॉवरग्रीड महामंडळाने देणगी दिलेल्या या 8 रुग्णवाहिका 108 आपत्कालीन सेवेद्वारे वापरल्या जाणार आहेत.

 Vishwajeet Rane
Goa Airport: ...तर दाबोळी लवकरच होईल ‘घोस्ट एअरपोर्ट’

याशिवाय महापालिका क्षेत्रातील उपआरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण नगरविकास विभागांतर्गत केले जाणार असल्याचे राणे यांनी नमूद केले. उत्तर आणि दक्षिण गोव्यात 100 कोटी रुपयांची दोन आपत्कालीन काळजी केंद्रे मिळाली आहेत. आम्ही त्यांना चालना देण्याच्या प्रक्रियेत आहोत, असे राणे यांनी नमूद केले. रुग्णवाहिकांच्या गरजेबद्दल विचारले असता, आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला आणखी २५ रुग्णवाहिकांची गरज आहे, असे सांगितले.

 Vishwajeet Rane
CM Pramod Sawant: युवकांसाठी उद्योग हेच भविष्य!

नियमबाह्य व्यवसायांना परवानगी देणार नाही!

प्रमाणपत्र, जागा, प्रशिक्षित कर्मचारी इत्यादींसंबंधीचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे न पाळता किनारी पट्ट्यात सुरू असलेल्या स्पा आणि मसाज पार्लरला चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. पुढील विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने स्टेमी प्रोग्राम डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे, ही अभिमानाची बाब आहे. गोमेकॉमध्ये पेट स्कॅन सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. पेट स्कॅन सुविधेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएमसीला अधिक सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची गरज आहे.

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com