Andaman Waters Drug Seizure : अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Biggest Ever Haul at Andaman: या ऑपरेशनमध्ये म्यानमारच्या सहा नागरिकांना अटक. जप्त करण्यात आलेले मेथॅम्फेटामाइन भारतीय बाजारपेठेत तसेच इतर शेजारी देशांमध्ये विकण्यासाठी आणले होते अशी शंका .
Biggest Ever Haul at Andaman
Biggest Ever Haul at AndamanDainik Gomantak
Published on
Updated on

Coast Guard seized 5 tones of drugs in Andaman 

पोर्ट ब्लेअर : गुजरातजवळ ड्रग्ज जप्त केल्याच्या घटनेला आठवडा होत असतानाच अंदमान निकोबारजवळ एका बोटीतून तब्बल सहा हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. मासेमारीच्या बोटमधून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तपास सुरू आहे. भारतीय तटरक्षक दलाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी रुपयांचे हे अमली पदार्थ मासेमारीच्या होडीमधून ३,००० पॅकेटमध्ये दडवून ठेवण्यात आले होते. एकूणच या ऑपरेशनमध्ये म्यानमारच्या सहा नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

Biggest Ever Haul at Andaman
Gujarat Drugs Case: गुजरातमध्ये जहाजातून तब्बल ५०० किलो अमली पदार्थ जप्त, NCB- नौदलाची मोठी कारवाई

जप्त करण्यात आलेले मेथॅम्फेटामाइन भारतीय बाजारपेठेत तसेच इतर शेजारी देशांमध्ये विकण्यासाठी आणले होते अशी शंका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. सध्या या तस्करीमागचा प्रमुख सूत्रधार शोधण्यासाठी तसेच इतर संबंधित तपशील गोळा करण्यासाठी तपास सुरु झाला आहे.

यापूर्वी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने गुजरातमधल्या पोरबंदर किनाऱ्यावरून १५ नोव्हेंबर रोजी ५०० किलोचे अमलीपदार्थ जप्त केले होते. या जप्त केलेल्या अमलीपदार्थंची किंमत ७०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर आली होती. दिल्ली एनसीबीला संबंधित माहिती मिळताच त्यांनी गुजरात एनसीबी, तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने हा छापा टाकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vagator Beach Hostel Drug Racket
Goa maritime security workshop in Vasco
US strikes Iran amid nuclear deal talks
Goa drug case accused acquitted due to investigation error
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com