Goa News: "पंचांना लाज वाटली पाहिजे" मुख्यमंत्र्यांनी सर्वण वासियांना सुनावले खडे बोल

Pramod Sawant: डिचोली तालुक्यातील सर्वण या भागात नवीन पंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले
Goa panchayat issues
Goa panchayat issuesDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १ एप्रिल) रोजी डिचोली तालुक्यातील सर्वण या भागात नवीन पंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मिळालेली पन्नास लाख रुपयांची रक्कम वापरून पंचायतीने नवीन इमारत उभी करून दाखवली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आणि यासोबतच त्यांनी स्थानिकांना कचऱ्याच्या निचर न केल्याबाबद्दल काही खडेबोल सुनावले.

कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रत्येक गावाने मेहनत घेतली पाहिजे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून राबवल्या सर्व योजना गावांमधील जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि याची जबाबदरी फक्त पंच आणि सरपंचांची नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्यांची आहे.

Goa panchayat issues
Goa News: कोठार्ली साळावली धरणाच्या कालव्यात पडून 57 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

गावांमध्ये फिरून त्यांनी सर्वे केले पाहिजेत असे न केल्यास मात्र कारवाई केली जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय. जे कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत त्यांच्याबद्दल तक्रार दाखल करावी म्हणजे त्यांची बदली करावी की त्यांना करणं दाखवा नोटीस पाठवावी की कायमचं निष्कासित करावं याचा विचार करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा कामाचा पगार दिला जातो आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम चोख करणं गरजेचं आहे. याबरोबरच त्यांनी ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी गावातील स्वच्छतेच्या महत्वावर भर दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाची असल्याचं म्हणत गावकऱ्यांची कानउघाडणी केली. स्वच्छतेमुळे सर्वांना फायदाच होईल त्यामुळे किमान गावाच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्या असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. सर्वण या गावात जागोजागी पडलेले प्लस्टिकच्या पिशव्यांचे ढीग कमी झाले पाहिजेत यामुळे फक्त आणि फक्त रोगराईचं वाढेल असं मुख्यमंत्री सांगत होते. गावात आल्या-आल्या येणारा दुर्गंध कमी झाला पाहिजे आणि पंचांना या वागणुकीबद्दल लाज वाटली पाहिजे असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com