CM Pramod Sawant: प्रभावी व्यक्तींच्या यादीमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची एंट्री! बच्चन, कोहली, अल्लू अर्जुन यांना टाकले मागे

Influential persons in India: देशातील अग्रगण्य इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने देशातील १०० प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
CM Pramod Sawant, Science Day
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशातील अग्रगण्य इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने देशातील १०० प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उद्योजक गौतम अदानी, राहुल गांधी यांचा तर समावेश आहेच, शिवाय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही या यादीत समावेश असून, ते या यादीत ६३ व्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन हे या यादीत ९९ व्या स्थानावर आहेत, तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याही पूर्वीचा ६३ वा क्रमांक पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. भाजपचे महत्त्व त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी भाजपला यश मिळवून दिले, परंतु पक्ष काही ४००च्या पार गेला नाही. इंडिया आघाडीने या निवडणुकीत चांगली लढत दिली.

इंडिया आघाडीचे प्रभावशाली नेते राहिलेले राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचाही या यादीत समावेश असला तरी राहुल गांधी यांनी इतर मुकेश अंबानी, गौतम अदानी, शरद पवार, अखिलेश यादव यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. याशिवाय विराट कोहली, कुमार मंगलम बिर्ला हेसुद्धा यादीत असले तरी ते मुख्यमंत्री सावंत यांच्यानंतरच्या क्रमांकावर आहेत.

CM Pramod Sawant, Science Day
Goa CM Pramod Sawant: गोव्याच्या इतिहासात प्रमोद सावंत यांनी नोंदवला अनोखा विक्रम! मुख्यमंत्रीपदाची सलग सहा वर्षे केली पूर्ण

या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केवळ राजकारण्यांचीच नावे नाहीत, तर सर्व क्षेत्रातील लोकांचा त्यात समावेश आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देशातील अनेक प्रभावशाली नेतृत्वांना मागे टाकत ६३ वा क्रमांक पटकावला आहे.

CM Pramod Sawant, Science Day
Goa CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री करणार? काय म्हणाले प्रमोद सावंत?

महानायक ९९ व्या स्थानावर

महानायक तथा अमिताभ बच्चन हे प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ९९ व्या स्थानावर आहेत. त्यांच्याशिवाय चित्रपट क्षेत्रातील अल्लू अर्जुनही या यादीत असून तो ९२ व्या स्थानावर, बाबा रामदेव ९३ व्या, तर करण जोहर ९६ व्या स्थानावर आहेत. या यादीचे शंभरावे स्थान अभिनेत्री आलिया भटने पटकावले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचे नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. सीतारामन या पाचव्या स्थानावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com