Goa News: कोठार्ली साळावली धरणाच्या कालव्यात पडून 57 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

Drowning Case: याच कालव्यात आतापर्यत अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
Drowning
DrowningDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: कोठार्ली-सांगे येथील साळावली धरणाच्या कालव्यात पडून प्रकाश गावकर (५७, रा. कोठार्ली) यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कालव्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्तीजवळ सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी गेली कित्येक वर्षे सांगूनही जलसंपदा खात्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज सोमवारी स्थानिकांच्या वतीने पंचसदस्य विठ्ठल गावकर यांनी रस्ता अडविण्याचा इशारा दिला. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे.

Drowning
Goa Crime: दिल्लीतून गोव्यात आला बनावट पोलिस अधिकारी, व्यावसायिकाचा शूट केला अश्लील व्हिडिओ; Video Viral करण्याची धमकी देत उकळले 30 लाख

ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रकाश गावकर कालव्यात पडून मरण पावले, त्या ठिकाणी जवळच प्राथमिक शाळा आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूने लोकांना येण्याजाण्यासाठी कच्चा रस्ता असल्यामुळे चिमुरडी मुले तेथूनच शाळेत येजा करतात. शिवाय याच कालव्यात आतापर्यत अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर उद्घाटन सोहळ्यासाठी गावात आले असता ग्रामस्थांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होते. त्यांनी उपाययोजना आखणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप काहीच हालचाल केली नसल्याने नाहक ग्रामस्थांचा बळी जात असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com