Mopa Airport: गोष्ट मोपाच्‍या नामकरणाची 'खरी कुजबूज'

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव द्यावे अशी मागणी आहे.
Mopa Airport |Goa News
Mopa Airport |Goa NewsDainik Gomantak

पेडणे मतदारसंघातील मोपा विमानतळास कुठल्या राजकीय नेत्याचे नाव द्यावे, यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवाय विविध राजकीय नेत्यांची नावे समोर येताहेत. अशावेळी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव द्यावे, ही मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

या विषयावर काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी मगोच्या आमदारांना लक्ष्य केले आहे. मगोच्या आमदारांनी याप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्‍यांनी लावून धरली असून भाऊंचे नाव न दिल्यास ते सरकारला दिलेला आपला पाठिंबा काढतील का, हे सांगावे असे आव्‍हान दिले आहे.

Mopa Airport |Goa News
Goa News: कला, संस्कृतीच्या उत्कर्षासाठी नवनवीन उपक्रमांवर भर देणार- मुनगंटीवार

त्यामुळे आता मगोचे आमदार काय भूमिका घेतात व भाजपावाले या विमानतळाला कुणाचे नाव देतात, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. मोपा विमानतळास नाव कुणाचेही दिल्यास वाद हा होणारच आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे, हे नक्की

कला अकादमी एकटी नाही

यमुना काठी शहाजहॉंनने उभारलेला ताजमहाल हे जगातील एक आश्चर्य आहे. पण असे असूनही त्याची चर्चा झाली नाही इतकी चर्चा आपल्या गोव्याच्या शहाजहाँनच्या कला अकादमीची नित्यशः होत आहे. भाऊसाहेबांच्या काळात ती वास्तू उभारताना जितका खर्च आला, त्याच्या कितीतरी पट खर्च दुरुस्तीवर झाल्याचा आरोप टीकाकार करत आहेत.

Mopa Airport |Goa News
गोव्यात महिलांसाठी Skill Development Training; सक्षमीकरणासाठी महत्त्वाच पाऊल

तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी त्यानंतरच्या काळात सरकारने कला व संस्‍कृती क्षेत्रात फोंडा, कुडचडे, मडगावसारख्या भागात उभारलेल्या कला केंद्र वा भवनांची अवस्था वेगळी नाही याकडे कोणीच लक्ष देत नाही. सांकवाळ व कुठ्ठाळीतील भवनांची कथा तर वेगळीच आहे. त्यामुळे हे क्षेत्र शबय घालण्यासाठीच असल्याची लोकांची भावना बनत चालली आहे.

काँग्रेसचा जळफळाट

गोव्यात भ्रमंती करुन पुढील दौऱ्यावर निघून गेलेल्या श्रीराम रथयात्रेबाबत गोवा प्रदेश काँग्रेसने केलेले आकांडतांडव म्हणजे ‘बैल गेला नी झोपा केला’सारखे आहे. कारण ती यात्रा काही हल्लीची नाही तर गेल्या कित्येक महिन्यांपूर्वी सुरू झालेली आहे. विविध राज्यांत भ्रमंती करून ती गोव्‍यात दाखल झाली होती.

Mopa Airport |Goa News
Goa Agriculture: सत्तरीत मिळणार स्‍वस्‍त, अन् मस्‍त भाजी!

सदर रथ जर मोटरवाहन कायद्याचे उल्लंघन करणारा असेल तर राष्ट्रीय स्तरावर त्या पक्षाने तो उचलून धरला असता. पण तसे काही झाले नाही. उलट गोव्यातील काँग्रेसवाले ज्या पद्धतीने यात्रेवर टीका करत आहेत, त्यावरून त्यांच्याकडे कसलाच मुद्दा उरलेला नाही किंवा हल्लीच भाजपमध्‍ये गेलेले आपले सर्व आमदार ‘राममय’ झाल्याने त्यांचा जळफळाट झालेला आहे, असे भाजपवाले म्हणत आहेत. खरे काय अन्‌ खोटे काय ते त्‍या रामालाच माहीत.

शॅडो कौन्सिलचे दुखणे

साळ नदीतील प्रदूषण हा विषय सध्या राजकारण्‍यांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर मडगाव शॅडो कौन्सिल ही बिगरसरकारी संघटनाही आता त्यात उतरली आहे. या संघटनेने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे या विषयात आणखी रंग भरतो की काय हे पाहावे लागेल.

Mopa Airport |Goa News
Goa Tourism : आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी 'मिशन युरोप'

एक खरे की, कोणत्याही प्रकरणात हे कौन्सिल दिगंबरपंतांना लक्ष्य केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा व्यक्तिगत आकस तर नाही ना, असा संशय येतो. शॅडोवाले म्हणतात त्यात तथ्य असेल तर मडगावकर त्यांना व त्यांच्या पॅनलला कसे निवडून देतात व शॅडोचा एकही उमेदवार अनामत रक्कमसुद्धा कशी काय राखू शकत नाही, असा मुद्दा बाबाचे समर्थक उपस्थित करत आहेत.

अन्य पंचायतींना धडा

पंचायत क्षेत्रात सार्वजनिक जमिनींवर अतिक्रमण झालेले असेल तर त्याबाबत त्वरित पावले उचलून ते हटविण्याचा अधिकार त्या पंचायतींना असतो. पण कोणतीच पंचायत त्याबाबत पावले उचलताना दिसत नाही. उलट गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून मोकळ्या होतात. कारण त्यात अनेकांचे राजकीय व व्यक्तिगत हितसंबंध गुंतलेले असतात.

Mopa Airport |Goa News
Goa News: चार्जिंग केंद्रांसाठी एकही बोली नाही

ग्रामीण भागात मुख्य रस्त्यावर उभी ठाकलेली अतिक्रमणे ही त्याचेच कारण होय. कोविड काळात अनेक ठिकाणी रस्त्यावर बसून विक्री करणारे आता अडथळा ठरले आहेत व संबंधित यंत्रणा त्याकडे कानाडोळा करत आहेत. या पार्श्वभूमीवर सांताक्रुझ पंचायतीने बुलडोझर वापरून हटविलेल्या अतिक्रमणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्‍या आहेत.

नवे पंचायत मंडळ असल्याने त्याने हे धाडस केले असावे अशी चर्चा असली तरी त्यांच्या या हिमतीची दखल अन्य पंचायत मंडळांनी घेऊन आपल्या क्षेत्रातील अतिक्रमणे हटविली तर बदललेले चित्र पहायला मिळू शकते, अशी चर्चा आहे.

Mopa Airport |Goa News
Free LPG Cylinder in Goa : आता गोव्यात मिळणार तीन सिलिंडर मोफत; कुणाला मिळणार फायदा? जाणून घ्या एका क्लिकवर

काँग्रेसच्या हाती रथयात्रेचे कोलीत

अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली असतानाच शिक्षण प्रणालीमध्ये रामायणाचा व खऱ्या भारताच्या इतिहासाचा समावेश करणे आणि इंडियाचे रूपांतर भारतात करणे यासाठी श्रीशक्ती शांतानंद महर्षी यांची रामराज्य दिग्विजय रथयात्रा सुरू झाली आहे.

अयोध्येमधून सुरू झालेली ही यात्रा भारत आणि नेपाळमधून ६० दिवसांत २७ राज्यांमधून प्रवास करत १६ हजार किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा अयोध्येमध्ये पोहोचणार आहे. ही यात्रा शनिवारी गोव्यात होती. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री आणि भाजप संघ परिवारातील संघटनांनी यात्रेचे भव्य स्वागत केले. रविवारी ती कर्नाटकात गेली.

Mopa Airport |Goa News
Mopa Airport: ‘मोपा’ला भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव मिळावे

पण जाता जाता ही रथयात्रा काँग्रेसला आयतेच हाती कोलीत देऊन गेली. त्यामुळे काँग्रेस नेते आता भाजप परिवारावर धडाधड तोफा डागत आहेत.

काँग्रेस पक्षाची सक्रियता?

नुकताच दक्षता सप्ताह पार पडला. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, त्यांच्याकडे भ्रष्टाचारची एकही तक्रार अलीकडच्या काळात आलेली नाही. यास हरकत घेत काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. मुळात सरकारकडे दक्षता तसेच सीबीआय यासारख्या एजन्सी आहेत.

Mopa Airport |Goa News
Goa News: कार्डियाक युनिटला डॉ. मंजुनाथ देसाईंचे नाव द्या - प्रमोद सावंत

मात्र दक्षता खात्याकडे येणाऱ्या तक्रारींची पारदर्शकता पद्धतीने चौकशी होतच नाही व अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो, असे काँग्रेसचे एल्विस गोम्स म्हणतात. तर, यापूर्वी खाण घोटाळा, लुईस बर्जर घोटाळा, सरकारी नोकरी घोटाळा, एसईझेड घोटाळा, पोलिस स्थानकावर दगडफेक आदी प्रकरणे गाजली.

त्या प्रकरणांचे पुढे काय झाले? सध्या काँग्रेसच्या नेत्यांनी हे विषय येणाऱ्या काळात लावून धरण्याचे ठरविले आहे असेच दिसते. अशावेळी सत्ताधारी हे विषय कसे हाताळतात हे पाहणे महत्त्‍वाचे ठरेल. कारण हे विषय घेणे म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने आतापासूनच कंबर कसल्‍याचे व सरकारला घेरण्याची तयारी केल्याचे दिसते.

Mopa Airport |Goa News
Mopa Airport News: ‘मोपा’वरील नोकऱ्यांची माहिती पंचायतींना देणार

सोशल मीडियावर ‘बारसे’

गोव्यात सध्या नवीन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून भलताच राजकीय वाद सुरू झाला आहे. आपल्या घरातील कोणताही सण गोमंतकीय उत्साहाने साजरा करतात. त्यातील बारसा हा आवडता कार्यक्रम. बाळाला कोणते नाव ठेवले जाईल, ते कोण ठेवणार, त्या मागचा अर्थ आणि कारण यावर बरेच संशोधन आणि विचार केला जातो.

मोपा विमानतळाच्या बाबतीत देखील हेच होत आहे. माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर यांच्यावरील वाद आता इतर गोष्‍टींकडे पोहोचला आहे. त्‍यात दाबोळी विमानतळ, नवीन झवारी पूल आणि इतर प्रकल्पांचा समावेश झाला असल्याने गोव्यात सध्या बारसा सुरू असल्याच्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com