Goa Tourism : आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी 'मिशन युरोप'

पर्यटन खात्याकडून येत्या नववर्षात फ्रँकफर्ट, झ्युरिच, पॅरिस आणि व्हिएनामध्ये दौरा केला जाणार असून यासाठी जवळपास 1.7 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
UK Tourist in Goa
UK Tourist in GoaDainik Gomantak

Goa Tourism : गोवा पर्यटन खात्याने जबाबदार आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. पर्यटन खात्याकडून येत्या नववर्षात फ्रँकफर्ट, झ्युरिच, पॅरिस आणि व्हिएनामध्ये दौरा केला जाणार असून यासाठी जवळपास 1.7 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. युरोपातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गोवा पर्यटन खात्याकडून रोडशो काढले जाणार आहेत. लंडनमध्ये आयोजित वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टनंतर लगेचच हा दौरा केला जाणार आहे.

पर्यटन खात्याच्या एका अधिकाऱ्याने या रोडशोच्या आयोजनाबद्दल माहिती दिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या रोडशोचं आयोजन केलं जाणार असून जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करण्यासाठी आणि गोव्याला एक सुरक्षित आणि सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून पुढे आणणं याचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. गोवा पर्यटन खात्याने नुकतीच गोव्यात जबाबदार पर्यटकांना आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

गोव्याचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जसारख्या गोष्टींमुळे खराब झालं आहे. त्यामुळे गोव्याची एक पर्यटन राज्य म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी तसंच पर्यटकांना गोवा एक सुरक्षित आणि हक्काचं टुरिस्ट डेस्टिनेशन वाटावं यासाठी रोडशोमधून प्रचार केला जाणार आहे. युरोपसह पोलंड दक्षिण कोरिया, जपान, आणि अमेरिकेला नवी बाजारपेठ म्हणून गोवा राज्याचं पर्यटन खातं पाहातंय. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रामुख्याने रशिया आणि ब्रिटनच्या पर्यटकांचा समावेश आहे. मात्र केवळ या दोन देशांवरच अवलंबून राहण्यापेक्षा आता अन्य देशांमध्येही गोव्याचा दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केलं आहे.

UK Tourist in Goa
Charter Plane Arrived in Goa : यंदाच्या हंगामातील पहिलं चार्टर प्लेन गोव्यात दाखल

गोव्याचं नवीन मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यावर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान पर्यटकांना घेऊन 26 ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल झालं आहे. 180 पर्यटक आणि 9 क्रू मेंबर्सना घेऊन हे चार्टर प्लेन दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. तर काल 6 नोव्हेंबर रोजी युकेतून पहिले चार्टर विमान 252 पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल झाले. प्रत्येक पर्यटन हंगामात ‘युके’ मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल होतात. यंदा मात्र ई -व्हिसाच्या समस्येमुळे ही संख्या काहीशी कमी झाली आहे. भारत सरकारच्या ई-व्हिसा समस्येमुळे ब्रिटनच्या अनेक नागरिकांना गोव्याकडे वळता आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com