Konkani Academy in Maharashtra: गोवा-महाराष्ट्राच्या नात्याला कोकणीचा सांस्कृतिक सेतू; महाराष्ट्रात स्वतंत्र कोकणी अकादमीसाठी CM सावंत फडणवीसांना पत्र लिहिणार

Konkani Language: गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे आणि मुंबईतील साहित्यिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
Konkani Language
Konkani Academy in MaharashtraDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे आणि मुंबईतील साहित्यिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. गोवा आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र कोकणी अकादमी स्थापन करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पुणे येथील यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृहात ३४ व्या अखिल भारत कोकणी परिषदेचे उद्घाटन डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी साहित्यिक अरुणा ढेरे, अधिवेशनाचे अध्यक्ष नंदगोपाळ शणै आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कोकणी अकादमी स्थापन झाल्यास कोकणी भाषा आणि साहित्याच्या विकासाला चालना मिळेल. तसेच कोकणी साहित्यिकांनाही त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणी ही गोव्याची खरी ओळख असून राज्याचा वारसा आणि संस्कृती यांच्याशी तिचे अतूट नाते आहे. शिक्षण, संशोधन आणि डिजिटल माध्यमांतून कोकणी भाषेचा विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्यिक प्रयत्न करीत असले तरी नव्या पिढीने, विशेषतः ‘जेन झी’नेही या कार्यात योगदान द्यावे. तरुणांना साहित्याशी जोडणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. साहित्याच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळत नसला तरी मानसिक समाधान मिळते, असेही ते म्हणाले.

Konkani Language
Goa Ujjwala Scheme: 'गोवा उज्ज्वला'च्या लाभार्थ्यांना 15 दिवसांत प्रत्येकी 3 हजार रुपये; मंत्री संकल्प आमोणकरांची ग्वाही

राष्ट्रनिर्मितीत सुसंस्कृत कोकणी समाजाने अधिकाधिक योगदान देणे आवश्यक असल्याचे अध्यक्षीय भाषणात नंदगोपाळ शणै यांनी सांगितले. त्यांनी गोवा-महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि साहित्यिक संबंधांचा उल्लेख करत त्यांना संस्थात्मक बळ मिळण्याची गरज अधोरेखित केली. अकादमीमुळे कोकणी भाषेचा अभ्यास, साहित्यनिर्मिती आणि साहित्यिकांमधील संवाद यांना व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नव्या तंत्रज्ञानाशी जोडा!

कोकणीचा वापर दैनंदिन व्यवहारापुरता मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांमधील उपलब्धता वाढल्यास भाषा आणि साहित्य तरुणांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल. भाषेचे जतन आणि संवर्धन ही समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Konkani Language
Goa Water Shortage: गोव्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट? 108 वर्षांतील सर्वांत कमी पाऊस; राज्यपालांचा इशारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.