Goa Ujjwala Scheme: 'गोवा उज्ज्वला'च्या लाभार्थ्यांना 15 दिवसांत प्रत्येकी 3 हजार रुपये; मंत्री संकल्प आमोणकरांची ग्वाही

Ujjwala Scheme 3000 Rupees: ‘गोवा उज्ज्वला योजने’अंतर्गत अर्ज केलेल्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत येत्या १५ दिवसांत प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात येतील.
Ujjwala Scheme 3000 Rupees
Goa Ujjwala SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: ‘गोवा उज्ज्वला योजने’अंतर्गत अर्ज केलेल्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत येत्या १५ दिवसांत प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात येतील, अशी ग्वाही नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहारमंत्री संकल्प आमोणकर यांनी शनिवारी सडा येथे दिली.

मंत्रिपद मिळाल्यानंतर आमोणकर यांनी प्रथमच सडा भागाला भेट दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी त्यांचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी विविध घरांना भेटी देत मिठाईचे वाटप केले.

Ujjwala Scheme 3000 Rupees
Goa Water Shortage: गोव्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट? 108 वर्षांतील सर्वांत कमी पाऊस; राज्यपालांचा इशारा

आपल्याकडे आलेल्या खात्यांच्या कामकाजाला सुरुवात केली असून, नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या भेटीदरम्यान उज्ज्वला योजनेच्या अनुदानाचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होईल. मात्र, येत्या १५ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांत तीन हजार रुपये जमा केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Scheme
Goa Ujjwala Scheme
Goa Ujjwala Scheme Pending Payments
Goa Ujjwala Scheme Latest News