Goa Congress In charge Dinesh Gundu Rao
Goa Congress In charge Dinesh Gundu RaoDainik Gomantak

समविचारी पक्षाबरोबर युती करण्याचे दिनेश गुंडू राव यांचे वक्तव्य

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते लुईझिन फालेरो यांच्या राजीनाम्यामुळे हादरलेल्या कॉंग्रेसला युतीची गरज
Published on

Goa Election 2022: कॉंग्रेस पक्षाचे (Congress) नेते गेले अनेक महिने युतीबाबत बोलण्याचे टाळत होते. मात्र, शेवटी आज कॉंग्रेसने युतीचे संकेत (Indications of alliance) दिले. गोवा राज्य कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव (Goa Congress In charge Dinesh Gundu Rao) यांनी समविचारी पक्षासोबत कॉंग्रेस युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य आज केले.

Goa Congress In charge Dinesh Gundu Rao
गोव्यात राजकीय हालचालींना पुन्हा वेग; फोलेरो कोलकात्याला रवाना

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राव यांनी सांगितले की, समविचारी पक्षांसोबत युती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही कॉंग्रेसमध्ये आणखी फूट पडू नये यासाठी सतर्क आहोत. लोकांशी बांधिलकी व विश्‍वासपात्र उमेदवार आम्ही निवडणुकीत उतरवणार आहोत, असेही राव यांनी यावेळी सांगितले.

Goa Congress In charge Dinesh Gundu Rao
मंत्री मायकल लोबो दिल्लीत, काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटण्याची दाट शक्यता

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतच गोवा फॉरवर्ड पक्षही कॉंग्रेससोबत युती करून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे. त्यासाठी वरील दोन्ही पक्षांनी कॉंग्रेसकडे प्रस्ताव ठेवले होते व युतीबाबत लवकर निर्णय घ्या, असे सांगून दोन ते तीन तारखाही दिल्या होत्या. मात्र, आम्ही ४० ही मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

Goa Congress In charge Dinesh Gundu Rao
स्वच्छ प्रतिमेच्या इतर पक्षातील नेत्यांचे आपमध्ये स्वागत

सर्व मतदारसंघात कॉंग्रेसला अनुकूल वातावरण आहे असे सांगून कॉंग्रेसचे नेते युतीबाबत काहीच बोलण्यास तयार नव्हते. गोवा काँग्रेसचे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीसुद्धा आपल्या दोन्ही भेटीवेळी युतीबाबत पत्रकारांनी विचारूनही युतीविषयी काहीच सांगितले नव्हते.

Goa Congress In charge Dinesh Gundu Rao
'इतर कुणी नेते फुटू नयेत' यासाठी काँग्रेसच्या हालचाली

काल माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेस पक्षासोबतच आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे हादरलेल्या कॉंग्रेसला युतीची गरज वाटू लागली आणि त्या गरजेतूनच आज राव यांनी समविचारी पक्षासोबत युतीसाठी आम्ही तयार असल्याचे प्रतिपादन केले.

Goa Congress In charge Dinesh Gundu Rao
काँग्रेस उमेदवारीसाठी वास्कोमध्ये माजी नगराध्यक्ष 'नंदादीप राऊत' यांचे नाव चर्चेत

फुटीरांना प्रवेश नाहीच

मागील निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपात दाखल झालेल्या फुटीर आमदारांना कॉंग्रेस कदापी पुन्हा पक्षात घेणार नाही उमेदवारी तर दूरची गोष्ट आहे

- दिनेश गुंडू राव, गोवा काँग्रेस प्रभारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com