स्वच्छ प्रतिमेच्या इतर पक्षातील नेत्यांचे आपमध्ये स्वागत

४० ही मतदारसंघात काढणार पदयात्रा - वाल्मीकी नाईक
AAP Leader Valmiki 
Naik
AAP Leader Valmiki NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्षाला (AAP) राज्यात स्वच्छ व भ्रष्टाचारविरहीत राज्य करायचे आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या इतर पक्षातील नेत्यांचे आप मध्ये स्वागत आहे. असे प्रतिपादन आपचे प्रवक्ते वाल्मीकी नाईक यांनी आज केले.

AAP Leader Valmiki 
Naik
Goa: मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली करण्याची कॉंग्रेसकडून होतेय मागणी

पणजी येथे आपच्या कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाईक यांनी सांगितले की आप लोकांसाठी चांगले काम करत आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केले आहेत. गोव्यातही तसेच सरकार आम्ही देणार आहोत.

येत्या काळात गोव्यात सरकार बदल निश्‍चित आहे. त्यासाठी चांगले नेते पक्षात येत असल्यास त्यांचे निश्‍चित स्वागत केले जाईल. इतर पक्षाशी युती करण्याबाबत अद्याप काही ठरलेले नाही असे नाईक यांनी युतीबाबत बोलताना सांगितले. गोव्यातील लोकाना परीवर्तन हवे आहे. बदल करण्यास लोक उत्सुक आहेत. येत्या निवडणुकीत गोवेकर आप ला संधी देणार आहेत. असा दावा यावेळी उपस्थित असलेल्या प्रवक्या सिसील रॉड्रिग्ज यांनी यावेळी केला.

AAP Leader Valmiki 
Naik
Goa Temple: दारे उघडली, आता भक्तांपुढे असेल आव्हान

काम करुन निवडणूका लढवाव्यात

देशात लोकशाही असल्याने कुठलाही पक्ष येथे येऊन निवडणुका लढवू शकतो, मात्र त्यां पक्षाने अगोदर लोकांसाठी काम करणे गरजेचे आहे. आप ने गेली काही वर्षे गोव्यात काम केले आहे. नवे नेते तयार केले आहेत. शेवटी कुणाला संधी द्यावी हे लोक ठरवणार आहेत. अशी प्रतिक्रिया तृणमूल कॉंग्रेसच्या गोवा प्रवेशाबद्दल विचारले असता वाल्मीकी नाईक यांनी दिली.

AAP Leader Valmiki 
Naik
हिंदी दिवसानिमित इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा तर्फे हिंदी सृजनोत्सव चे आयोजन

४० मतदारसंघात यात्रा काढणार

गोव्यात बदल हवाय, गोव्याला केजरीवाल हवेत! हे घोषवाक्य घेऊन आपचे नेते व कार्यकर्ते राज्यातील ४० ही मतदारसंघात एक दिवस एक मतदारंसघ यानुसार पदयात्रा काढणार आहेत. राज्यातील सर्व बुथवर बैठका घेण्यात येणार आहेत. या यात्रेला लोकांनी समर्थन द्यावे.

- वाल्मीकी नाईक (प्रवक्ते, आप)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com