'इतर कुणी नेते फुटू नयेत' यासाठी काँग्रेसच्या हालचाली

इतर कुणी नेते फालेरो सोबत जाऊ नयेत यासाठी कॉंग्रेसचे जोरदार प्रयत्न
गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेतली
गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेतलीDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election 2022: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले लुईझीन फालोरो (Congress Leader Luizinho Faleiro) यांनी आमदारकी सोडतानाच पक्षालाही रामराम केल्यानंतर गोव्यातील इतर कुणी नेते फालेरो सोबत जाऊ नयेत यासाठी कॉंग्रेसने (Congress) केंद्रिय स्तरावर व राज्यस्तरावरही जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेतली
स्वच्छ प्रतिमेच्या इतर पक्षातील नेत्यांचे आपमध्ये स्वागत

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कळंगुटचे माजी आमदार व प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आग्नेल फर्नाडिस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावले असून दिल्लीला पोचलेले फर्नाडिस हे राहूल गांधी भेट घेणार असल्याचे कळते. दुसरीकडे राज्यातील लुईझीन फालेरो समर्थक कॉंग्रेस नेते फुटू नयेत यासाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव प्रयत्न करत आहेत. नाराज नेत्यांना समजावण्यसाठी ते त्यांच्या घरी जात आहेत.

गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेतली
मंत्री मायकल लोबो दिल्लीत, काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटण्याची दाट शक्यता

राव यांनी घेतली सुरेंद्र फुर्तादोंची भेट

लुईझीन फालेरो यांनी काल कॉंग्रेसचा त्याग केल्यामुळे सावध झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेसचे अन्य नेते फूटू नयेत यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याच हालचालीचा एक भाग म्हणून आज गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पणजीचे माजी महापौर व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो (Congress Leader Surendra Furtado) यांची भेट त्यांच्या दोनापावला येथील निवासस्थानी जाऊन घेतली. व पक्षासोबत कायम राहण्याची विनंती केली. फुर्तादो हे लुईझीन फालेरो समर्थक म्हणून परिचीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com