मंत्री मायकल लोबो दिल्लीत, काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटण्याची दाट शक्यता

गेल्या काही दिवसांतील त्यांच्या हालचालींवरून ते दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता
Minister Michael Lobo
Minister Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

जसजशी गोवा विधानसभा 2022 ची (Goa Election 2022) निवडणूक जवळ येत आहे तस तसे गोव्यातील विविध पक्षांतील नेत्यांच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. मग ते लुईजीन फलेरो यांचा तृणमूल काँग्रेसमधील प्रवेश असो किंवा नेत्यांच्या इतर पक्षांशी गुप्त बैठका असो या वाढू लागल्या आहेत, त्यातच आत्ता हाती लागलेल्या माहितीनुसार भाजपा सरकारमध्ये मंत्री असलेले मायकल लोबो (Minister Michael Lobo) हे दिल्लीत गेले असून गेल्या काही दिवसांतील त्यांच्या हालचालींवरून ते दिल्लीत काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची दाट शक्यता आहे.

Minister Michael Lobo
Goa: मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली करण्याची कॉंग्रेसकडून होतेय मागणी

मागच्या काही दिवसांपासून मंत्री लोगो हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोगो ना तिकीट मिळू नये यासाठी पक्षाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव त्यांच्याकडे मागणी केली होती.

Minister Michael Lobo
स्वच्छ प्रतिमेच्या इतर पक्षातील नेत्यांचे आपमध्ये स्वागत

लोबो हे कळंगुट मतदार संघामधून स्वतः उभे राहू इच्छितात तसेच शिवोली मतदारसंघातून स्वतःच्या बायकोसाठी म्हणजेच दिलायला लोबो यांच्यासाठी उमेदवारी मागत आहेत, मात्र भाजप त्यांच्या बायकोसाठी शिवोली मतदारसंघ देण्यास बिलकुल तयार नाही. त्यामुळेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून हे दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेण्याचे मनसुबे लोगो यांनी रचले आहेत आणि त्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com