Goa Congress: काँग्रेसला सापडला होता उमेदवार पण...

Goa Congress: लोकसभेसाठी निर्णयच न झाल्याने निराशा
Goa congress
Goa congressDainik Gomanatk
Published on
Updated on

Goa Congress: कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मणिक्कम टागोर यांनी योग्यवेळी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करू, असे जाहीरपणे सांगितले आहे. प्रत्यक्षात वर्षभरापूर्वी उत्तर गोव्यासाठी भंडारी समाजाच्या एका नेत्याने कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती.

Goa congress
Goa Politics: लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी रणनीती; भाजपने कसली कंबर

मात्र, निर्णयच घेतला गेला नसल्याने तो नेता निराश झाला, अशी माहिती मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिल्यानंतरची ही घडामोड आहे. पाच मतदारसंघांतील कॉंग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले होते.

त्यांनी उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीत भाजपकडून भंडारी समाजाच्या केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी देण्यात येणार असेल तर कॉंग्रेसनेही भंडारी समाजाचाच उमेदवार रिंगणात उतरवावा, असे ठरवले. हे नेते काही निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या अधिकारी पदावर नसल्याने त्यांनी दिल्लीत जाऊन हा प्रश्न सोडवण्याचे ठरवले.

Goa congress
CM Arvind Kejriwal Case: अरविंद केजरीवाल यांना दिलासा

राज्य प्रभारी मणिक्कम टागोर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांना उत्तर गोव्यातील इतर मागासवर्गीयांचे प्रमाण आणि त्यातील भंडारी समाजाचे प्रमाण यांची आकडेवारी सादर केली. कॉंग्रेसने भंडारी समाजाच्या नेत्याचा विचार उत्तर गोव्यासाठी केला तर निवडणूक जिंकणे शक्य होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मात्र, यानंतरच्या चर्चेत लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक ताकदीचे काय करायचे, हा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला आला. पक्षीय पातळीवर आताच मोठी मदत करणे शक्य होणार नाही, याची कल्पना त्या उत्साही कार्यकर्त्यांना दिल्लीत देण्यात आली.

Goa congress
Goa Politics: बाबूश-विरोधक आमने-सामने; वादाला फुटले तोंड

हा प्रश्न चर्चेला येऊ शकतो, याची कल्पना असल्याने त्याची तजवीजही करण्यात आली होती. महाराष्ट्रातील तत्कालीन मंत्री सतेज पाटील यांनी तो आर्थिक भार उचलण्याची तयारी त्यावेळी दाखवली होती, अशी माहिती त्या बैठकीत नेत्याने दिली.

मी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती, हे खरे आहे. मात्र, काम सुरू करण्यापूर्वी उमेदवारीची हमी कोणीतरी देणे आवश्यक होते. तसे करण्यास पक्षाच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने निवडणूक लढवण्याची तयारी कशी करावी, हेच समजलेले नाही.

- लवू मामलेदार, माजी आमदार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com