Goa Politics: बाबूश-विरोधक आमने-सामने; वादाला फुटले तोंड

Goa Politics: वादाला फुटले तोंड: व्यावसायिकांच्या प्रश्‍नांचे उमटले पडसाद
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: दोनापावला येथील जेटीवर जाण्यासाठी कंत्राट दिले आहे, तेथे तिकीट आकारले जात आहे. बसेस जेटीवर पोहोचत नाहीत. त्यामुळे जेटीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम येथील पारंपरिक व्यावसायिकांवर होत असल्याच्या विषयाला गुरुवारी तोंड फुटले होते. मात्र, त्याचे पडसाद आज राजकीय पटलावर उमटल्याचे दिसून आले.

Goa Politics
Goa Beach: सेर्नाभाटीत बे-वॉच बनले बीच हाऊस

काँग्रेसचे आमदार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, कार्लुस फेरेरा व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जेटीला भेट दिल्यानंतर सत्ताधारी गटाचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हेही तेथे पोहोचल्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

दोनापावला जेटीचे नूतनीकरण झाल्यानंतर पर्यटकांना तेथे जाण्यासाठी पर्यटन खात्याने तिकीट आकारणी सुरू केली. तेथे कंत्राटदार नेमण्यात आला. त्या कंत्राटदाराने लहानग्यांसाठी 24 आणि मोठ्यांना 50 रुपये तिकीट दर ठेवला. त्याचे पडसाद अगोदरच उमटले.

तिकीट आकारण्याचे कंत्राट बाहेरील कंपन्यांना दिले, त्याचाही राग पारंपरिक व्यावसायिकांना होता, त्याचे पडसाद गुरुवारी उमटले. कंत्राटदार कंपनीच्या महिला प्रतिनिधीशी येथील व्यावसायिकांनी वाद घातला.

Goa Politics
Goa Crime News: समंथा मृत्यू प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल; मृत्युनंतर तब्बल तीन महिन्यांनी FIR

मंत्र्यांनी लक्ष घालावे: नेल्सन

नगरसेवक नेल्सन काब्राल यांनीही या प्रश्‍नी लक्ष घालण्याची मागणी मंत्री तथा आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे केली. आपण 1995 मध्ये नगरसेवक असताना येथे हॉकिंग झोन करण्याची मागणी केली होती, मनोहर पर्रीकरांनी आपणास त्याविषयी आश्‍वासनही दिल्याची आठवण नेल्सन यांनी करून दिली.

दोनापावला प्रवेशद्वार खुले होणार नाही

दोनापावला येथील प्रवेशद्वार खुले करावे, अशी मागणी व्यावसायिक महिलांनी लावून धरली. त्यावर बाबूश यांनी प्रवेशद्वार खुले करता येणार नाही. हा भाग पर्यटन खात्याच्या देखरेखीखाली येतो. पर्यटकांना तिकीट आकारण्याविषयी निविदा काढली होती, त्यानुसारच त्यांनी २५ व ५० रुपये पर्यटकांकडून घेतात. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला येथे व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मोन्सेरात यांनी नमूद केले.

प्रश्न सोडविण्यास मी समर्थ: मोन्सेरात

पर्यटकांची संख्या कमी झाल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे स्थानिक पारंपरिक व्यावसायिकांचे म्हणणे होते. याची दखल घेत काँग्रेसच्या आमदार व प्रदेशाध्यक्षांनी आज दुपारी दोनापावला जेटी गाठली. त्याठिकाणी पाहणी करून अर्धा तास होतोय तोच पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी त्याठिकाणी आपल्या लवाजम्यासह धाव घेतली.

आमदार झाल्यापासून आपण येथील व्यावसायिकांच्या पाठीशी आहोत, त्यांचे प्रश्‍न आणि समस्या सोडविण्यास आपण समर्थ आहोत, असे बाबूश यांनी सांगितले. परंतु येथे व्यवसाय करणारे हे गोमंतकीय आहेत, जेटीवर ज्या पद्धतीने तिकीट आकारणी होत आहे, त्याशिवाय पर्यटक घेऊन येणाऱ्या बसेस येऊ शकत नाहीत हे पाहता पर्यटन धोक्यात आले असल्याचे विरोधी आमदारांचे म्हणणे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com