BJP MGP Alliance: गोव्यात भाजप-मगो युती निश्चित; पण जागावाटपाचा फैसला दिल्ली दरबारी!

Goa Assembly Elections: येत्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती होणार हे निश्‍चित आहे. परंतु, जागा वाटपाची चर्चा आणि अंतिम निर्णय दिल्लीत भाजपच्‍या केंद्रीय नेत्‍यांसोबतच्‍या बैठकीत होईल.
Goa Assembly Elections
BJP MGP AllianceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: येत्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती होणार हे निश्‍चित आहे. परंतु, जागा वाटपाची चर्चा आणि अंतिम निर्णय दिल्लीत भाजपच्‍या केंद्रीय नेत्‍यांसोबतच्‍या बैठकीत होईल. सोमवारची मगोसोबतची बैठक प्राथमिक स्‍वरुपाची होती. त्‍यात जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

विधानसभा निवडणूक अवघ्‍या चार महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍याने सत्तेत असलेल्‍या भाजप आणि मगो पक्षाने निवडणुकीच्‍या तयारीस गती दिली आहे. या दोन्‍ही पक्षांत युती होण्‍याची चर्चा सुरू असतानाच मगोने फोंडा तालुक्‍यातील भाजपच्‍या ताब्‍यात असलेले फोंडा, प्रियोळ आणि शिरोडा या तीन मतदारसंघांवर अप्रत्‍यक्ष दावा केल्‍याने युतीचे काय होणार, असा प्रश्‍‍न मतदारांसमोर उभा राहिला होता.

Goa Assembly Elections
Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

त्‍यातच गेल्‍या सोमवारी भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक आणि मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांच्‍यात आल्‍तिनो येथील मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या सरकारी बंगल्‍यात मुख्‍यमंत्र्यांच्‍या उपस्‍थितीत बैठक झाली. या बैठकीत युतीसह जागा वाटपाचीही चर्चा झाली असण्‍याची शक्‍यता होती.

सोमवारची बैठक हाेती प्राथमिक स्‍वरुपाची

सोमवारची बैठक केवळ प्राथमिक स्‍वरुपाची होती, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री तथा मगोचे ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्‍यानंतर दामू नाईक यांनीही सांगितले. त्‍यामुळे भाजप-मगो युती आणि जागा वाटपाचे घोडे दिल्लीतील बैठकीनंतरच गंगेत न्‍हाणार असल्‍याचे स्पष्‍ट झाले आहे.

Goa Assembly Elections
FC Goa vs Fortis FC: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com