Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

Unity Ride 2026 receives welcome in Goa: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित या रॅलीत केरळ आणि कर्नाटक पोलिस दलातील अधिकारी व रायडर्स सहभागी झाले आहेत.
Goa Unity Ride 2026
Unity RideDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

चावडी: राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश देणाऱ्या ‘राष्ट्रीय मोटारसायकल रॅली २०२६-युनिटी राइड’चे १९ ऑक्टोबर रोजी पोळे येथील सीमा तपासणी नाक्यावर गोवा पोलिसांतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित या रॅलीत केरळ आणि कर्नाटक पोलिस दलातील अधिकारी व रायडर्स सहभागी झाले आहेत.

‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचे स्मरण करणे, देशाची एकात्मता अधिक दृढ करणे आणि अमलीपदार्थांच्या धोक्याविरोधात जनजागृती करणे हा रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

Goa Unity Ride 2026
FC Goa vs Fortis FC: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

स्वागतप्रसंगी पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, पोलिस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, काणकोण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे, पोलिस निरीक्षक थेरॉन एस. डिसोझा, वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक गौतम साळुंके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

तरुणांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा!

मोटारसायकल प्रवासाद्वारे एकता, बंधुभाव आणि अमलीपदार्थमुक्त समाजाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. अमलीपदार्थांचे व्यसन ही तरुण पिढीसमोरील गंभीर सामाजिक समस्या असून, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात येत आहे.

Goa Unity Ride 2026
Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com