FC Goa vs Fortis FC: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

FC Goa beats Fortis FC by 2-1: होर्गे ओर्तिझ आणि चिकी याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने मंगळवारी एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.
FC Goa vs Fortis FC
FC GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: होर्गे ओर्तिझ आणि चिकी याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने मंगळवारी एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई केली. कुवेतमधील महंमद अल-हमाद स्टेडियमवर झालेल्या क गटातील सामन्यात एफसी गोवाने बांगलादेशच्या फॉर्टिस एफसीवर २-१ फरकाने निसटती मात केली.

अगोदरच्या लढतीत तुर्कमेनिस्तानविरुद्ध ८५व्या मिनिटापर्यंत आघाडीवर राहूनही एफसी गोवाला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. मंगळवारी विजय नोंदवून गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने गुणखाते उघडले, तर फॉर्टिंस संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. एफसी गोवाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना शुक्रवारी (ता. २३) कुवेतच्या अल-कादसिया संघाविरुद्ध होईल.

FC Goa vs Fortis FC
Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

सामन्याच्या सहाव्याच मिनिटास ओर्तिझ याच्या भेदक हेडिंगमुळे एफसी गोवाला आघाडी मिळाली. त्याने हा गोल उदांता सिंगच्या क्रॉसपासवर नोंदविला. ७८व्या मिनिटास राफायेल तुडु याने फॉर्टिस एफसीला १-१ अशी बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना ८५व्या मिनिटास बदली खेळाडू फ्रान्चू याच्या असिस्टवर ख्रिस्तियन (चिकी) बोरेगो याचा नेम अचूक ठरला. चिकी याचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. भरपाई वेळेतील सातव्या मिनिटास फॉर्टिस एफसीच्या इस्सा जालोव याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com