

पणजी: काँग्रेसचे खासदार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक बिमोल अकोईजम यांच्यावर विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाने आज पणजीत आंदोलन केले. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच संबंधित खासदाराने तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पणजी येथील भाजपच्या कार्यालयासमोर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेतृत्व आणि खासदार अकोईजम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. महिला नेत्या ॲड. विद्या गावडे, जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिलांच्या हक्कांविषयी भूमिका मांडणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणावर मौन बाळगल्याचा आरोप तेंडुलकर यांनी केला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांनी या आरोपांची दखल घेऊन स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसमध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप करत तेंडुलकर यांनी पक्षाच्या महिला सुरक्षेविषयीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
लैंगिक शोषणाचा आरोप
खासदार अकोईजम यांच्यावर विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पणजीतील भाजप कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधातही घोषणाबाजी केली.
काँग्रेसची भूमिका दुटप्पी
महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाने विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर मौन का बाळगले, असा सवाल भाजप महिला मोर्चाने उपस्थित केला. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.