Banastarim Bridge Accident: भरधाव ‘मर्सिडीज’ने घेतला तिघांचा बळी, बाणस्तारी पुलावर भीषण अपघात

सात जखमी गोमेकाॅत दाखल, जमावाकडून संताप
Major Accident On Banastarim Bridge
Major Accident On Banastarim Bridge Dainik Gomantak

Major Accident On Banastarim Bridge फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ आज रात्री ८ वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार, तर चौघेजण जखमी झाले. फोंड्याहून भरधाव येणाऱ्या (जीए - ०७ - के - ७३११) मर्सिडीज गाडीने सुरवातील तीन दुचाक्या आणि नंतर तीन कारगाड्यांना ठोकल्याने हा विचित्र अपघात झाला.

या अपघातात दिवाडी येथील दुचाकीस्वार सुरेश फडते (वय ५८) व भावना फडते (वय ५२), तर अन्य एका दुचाकीवरील फातोर्डा येथील अनुप कर्माकर (वय २६) हे ठार झाले. या अपघातातील सात जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चारचाकीने जोरदार ठोकर दिल्याने दुचाकीवरील भावना फडते उसळून पुलाच्या खाली पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज कारगाडीने सुरवातीला बाणस्तारी पुलाजवळ थांबलेल्या दुचाकींना जोरदार ठोकर दिली व नंतर चुकीच्या ‘वनवे’त घुसून अन्य तीन कारगाड्यांना जोरदार ठोकर दिली.

अपघात झाल्यानंतरही मर्सिडीजच्या महिला चालकास स्थानिकांनी जाब विचारला असता, त्यांनी मृत पावलेल्यांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट त्या बाजूला जाऊन बसल्या.

काही वेळाने त्या निघूनही गेल्या. या सर्व प्रकाराबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला, अशी माहिती प्रत्यक्ष घटना पाहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव दिग्विजय वेलिंकर यांनी दिली.

Major Accident On Banastarim Bridge
Blitz Chess Tournament : नीतिश बेलुरकरला लॅटव्हियात उपविजेतेपद; 11 फेऱ्यांतून साडेनऊ गुणांची कमाई

बाणस्तारीचा बाजार असता तर...

बाणस्तारीच्या बाजारासाठी लोक विविध भागांतून गर्दी करीत असतात. आज रविवार असल्याने बाजार नव्हता. त्यामुळे या मार्गावर गर्दी कमी होती. बाजारादिवशी गुरुवार किंवा शुक्रवारी ही घटना घडली असती, तर अनेकांना जीव गमावावा लागला असता, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

मर्सिडीज स्थिरावली दुभाजकावर!

मर्सिडीज कारगाडीने तीन दुचाक्यांना ठोकर दिली, त्यानंतर दोन आल्टो व स्वीफ्ट गाडीला धडक दिली आणि त्यानंतर ती गाडी दुभाजकावर स्थिरावली. या काळातही चालकाला अपघात घडला याचे भान नव्हते. त्यामुळेच पाच, सहा गाड्यांना मर्सिडीज चालकाने ठोकरले.

सरपंचाचे सहकार्य

भोमचे सरपंच दामू नाईक यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले. तसेच जमावाला शांत करण्याचे कामही त्यांनी केले. तसेच तिवरे-वरगावचे सरपंच जयेश नाईक, विश्‍वजीत नाईक व इतरांनीही अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत केली.

Major Accident On Banastarim Bridge
Goa Chef Sarita Chavhan: कारगिल विजय दिनाच्या मेजवानीला गोमंतकीय हाताची चव; शेफ सरिता चव्हाण यांनी बनवले जेवण

सहा वाहनांना ठोकरले

हा अपघात मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. अपघातानंतर महिला कार चालकास धड चालताही येत नव्हते. त्यांच्या कारमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या.

त्यामुळे त्यांनी नशेतच सहा वाहनांना ठोकरले, अशी चर्चा उपस्थितांत सुरू होती. पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन दुचाकी चालकांची काहीही चूक नसताना, त्यांना ठोकरल्याने तिघांना प्राणास मुकावे लागले. या प्रकाराबाबत उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या अपघातात एका दांपत्यांचा मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली. या अपघातात वनिता भंडारी (२१, रा. सांताक्रूझ-फोंडा), शंकर हळर्णकर (६७, रा. बाणास्तरी), राज माजगावकर (२७, रा. ताळगाव) हे गंभीर जखमी झाले.

Major Accident On Banastarim Bridge
Banastarim Bridge Accident : बाणास्तरी पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

भावनाचा मृतदेह सापडला पुलाखाली

मर्सिडीजची ठोकर बसताच दुचाकीवरील भावना फडते पुलाखाली फेकल्या गेल्या, पण याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. नंतर दुचाकीच्या क्रमांकावरून कुणी तरी फडते कुटुबियांना अपघाताची माहिती दिल्यानंतर दुचाकीवर पती-पत्नी होते, अशी माहिती मिळाल्यावर शोधाशोध करण्यात आली, तेव्हा दुर्दैवी भावनाचा मृतदेह पुलाखाली सापडला.

Major Accident On Banastarim Bridge
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेलच्या किंमती स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट

ती’ मर्सिडीज कार सावर्डेकर कुटुंबीयांची

१ चुकीच्या बाजूने समोरून भरधाव वेगाने येऊन ६ वाहनांना धडक देणारी मर्सिडीज कार ही मडगाव येथील प्रथितयश बांधकाम व्‍यावसायिक सावर्डेकर कुटुंबीयांची असल्‍याची माहिती समोर आली आहे.

२ शिवाय कार मेघना सावर्डेकर यांच्‍या नावे असल्‍याची ‘आरटीओ’ नोंद आढळून आली आहे. बांधकाम व्‍यावसायिकांच्‍या वर्तुळात सावर्डेकर यांचे मोठे नाव आहे.

३ रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनेचा नेमका मागोवा घेत होते. तपासाअंती आणखी काही बाबी समोर येण्‍याची शक्‍यता आहे.

४ संतप्‍त जमावाने मर्सिडीज चालक महिलेची चाचणी करावी, अशी जोरदार मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com